Sharad Pawar Resigns: साहेब निर्णय मागे घ्यावा; शरद पवारांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादीचे साताऱ्यात आंदोलन

Sharad Pawar Retirement News: राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावरुन पायउतार होण्याची घोषणा केली. त्यानंतर राष्ट्रवादीत एकच अस्वस्थता पसरली.
Satara NCP Agitation
Satara NCP Agitation Pramod Ingale, Satara
Published on
Updated on

Satara NCP News : शेतकऱ्यांचा बुलंद आवाज शरद पवार Sharad Pawar.. शरद पवार, देश का नेता कैसा हो, पवार साहेब जैसा हो, आम्ही सगळे साहेबांसोबत, पवार साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है... अशी घोषणाबाजी करत साताऱ्यातील Satara NCP राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आम्ही सगळे शरद पवारांच्या पाठीशी असल्याचे स्पष्ट केले. तसेच पवार साहेबांनी अध्यक्षपद सोडू नये, त्यांनी आपला निर्णय मागे घ्यावा, अशी विनंती केली.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावरुन पायउतार होण्याची घोषणा केली. त्यानंतर राष्ट्रवादीत एकच अस्वस्थता पसरली. सातारा बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी भवनासमोर एकत्र येत आम्ही सगळे साहेबांसोबत अशा टोप्या घालून आंदोलन केले.

यावेळी पदाधिकाऱ्यांनी देश का नेता कैसा हो, शरद पवार जैसा हो, शेतकऱ्यांचा बुलंद आवाज शरद पवार...शरद पवार..., आम्ही सगळे साहेबांसोबत, पवार साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है...अशी घोषणाबाजी केली.

Satara NCP Agitation
Satara APMC Election : स्थानिक आघाड्यांना साथ; अनैसर्गिक युतीला नाकारले

या आंदोलनात जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील, युवकचे प्रदेश उपाध्यक्ष तेजस शिंदे, गोरखनाथ नलावडे, विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल शिंदे, महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्ष समिंद्रा जाधव, युवती सेलच्या अध्यक्षा पूजा काळे, अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष शफिक शेख, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष रमेश उबाळे, मंगेश ढाणे, कोरेगाव तालुका अध्यक्ष प्रथमेश पवार, राजेश लादे, नितीन लवंगारे आदी उपस्थित होते.

Satara NCP Agitation
Prithviraj Chavan on NCP: पृथ्वीराज चव्हाण यांचे मोठे वक्तव्य; राष्ट्रवादी अजून किती दिवस...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com