Salman Khan Death Threat : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी; पोलिसांकडून मोठी कारवाई

Crime News : '' सलमान खानला ३० तारखेला मारणार..''
Salman Khan Death Threat
Salman Khan Death ThreatSarkarnama
Published on
Updated on

Mumbai : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानला याअगोदर गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. यानंतर बॉलिवूडमध्ये एकच खळबळ उडाली होती. तसेच सलमान खानच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली होती. मात्र,आता दबंग खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे.

मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात अभिनेता सलमान खान(Salman Khan)ला जीवे मारण्याची धमकी देणारा कॉल आला आहे. मुंबई गुन्हे शाखेनं धमकी देणाऱ्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं आहे. तो मुळचा राजस्थानचा असून त्याला ठाणे जिल्ह्यातील शहापूरमधून ताब्यात घेण्यात आलं आहे. शहापूर येथे त्याच्या भावासोबत ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

Salman Khan Death Threat
Nashik Hailstorm News: एकनाथ शिंदे यांची पाठ फिरताच पुन्हा जोरदार गारपीट

मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला सोमवारी रात्री ९ वाजता हा धमकीचा फोन आला होता. यावेळी धमकी देणाऱ्याने स्वत:ची ओळख ही रॉकी भाई, गौरक्षक जोधपूर राजस्थान अशी सांगितली आहे. तसेच फोन करणाऱ्या व्यक्तीने सलमान खानला तो ३० तारखेला मारणार असल्याचे सांगितले. या प्रकरणी पोलीस(Police) अधिक तपास सुरु आहेत.

Salman Khan Death Threat
Thackeray-Shinde Politics: तर एकनाथ शिंदे राजीनामा देणार का? संजय राऊतांचा सवाल

..यापूर्वी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईकडून धमकी!

सलमान खानला याआधीही इमेलद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. धमकीचा ईमेल त्याच्या मॅनेजरच्या मेलवर आला होता.काळवीट मारल्याप्रकरणी सलमानने बिश्नोई समाजाची माफी मागितल्यानंतरच हे प्रकरण संपेल असे देखील लॉरेन्स बिश्नोईने सांगितले होते.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com