Nashik Hailstorm News: एकनाथ शिंदे यांची पाठ फिरताच पुन्हा जोरदार गारपीट

CM Eknath Shinde News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी सटाणा परिसरातील नुकसानीची पाहणी केली होती.
CM Eknath Shinde
CM Eknath ShindeSarkarnama

CM Eknath Shinde visit news : मोसम खोऱ्यातील (सटाणा) गावांची पाहणी करण्यास आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी गारपीटग्रस्त भागाची पाहणी केली. त्यांचा दौरा संपत नाही तोच दुपारनंतर या भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने या भागातील पिकांना पुन्हा झोडपले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी संपण्याची चिन्हे नाहीत.

बेमोसमी जोरदार हजेरी लावली. मागील तीन दिवसांपासून सुरु असलेल्या अवकाळी पावसाने येथील शेतकऱ्यांच्या (Farmers) पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आज झालेल्या पावसाने आरम खोऱ्यातील शेतपिके पूर्णपणे जमीनदोस्त केली आहेत. वादळी वाऱ्यासह सुपारीच्या आकाराच्या गारपीटीने शेतकरी पुरता कोलमडला आहे. शेतकऱ्यांना आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या घोषणेची प्रतिक्षा आहे.

CM Eknath Shinde
National Party Status : भारतात राष्ट्रीय पक्षाचा दर्जा कधी मिळतो? सध्या किती पक्षांना राष्ट्रीय दर्जा?

मागील तीन दिवसापासून जिल्ह्यातील बागलाण तालुक्यात अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा सुरु आहे. सोमवारी या भागात झालेल्या नुकसानीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह पालकमंत्री दादा भुसे यांनी पाहणी केली. हा पाहणी दौरा संपताच सायंकाळी सहाला पुन्हा जोरदार पावसाने हजेरी लावली.

सायंकाळी डांगसौंदाणेसह बागलाण तालुक्यातील जोरण, किकवारी, कपालेश्वर, तळवाडे, साकोडे साल्हेर परिसरात जोरदार हजेरी लावली. तब्बल एक तास हुन अधिक झालेल्या या पावसाने उन्हाळी कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे. तर उन्हाळी बाजरी भुईसपाट झाली. अनेक ठिकणी रस्त्यावर झाडे उन्मळून पडली. सततच्या पावसाने टोमॅटो, मिरची, कलिंगड पिके उद्ध्वस्त केली असून शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.

परिसरात उन्हाळी कांदा काढणीचा हंगाम सुरू असून अनेकांची कांदे जमिनीत आहेत तर काढणी केलेल्या कांद्यावरील प्लास्टिक ताडपत्री उडून गेल्याने कांदा ओला झाला आहे. या पावसाने सर्वाधिक नुकसान कांद्याचे झाले आहे तर मक्याचा साठवून ठेवलेला चारा पूर्णपणे भिजला आहे. अवकाळीने शेतकऱ्यांचे पूर्णपणे कंबरडे मोडले आहे. (Latest Nashik News)

CM Eknath Shinde
Threat to the Chief Minister : 'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना उडवणार..' ; कंट्रोल रूमवर धमकीचा फोन, एकच खळबळ..

परिसरात परिपक्व झालेल्या कांदा काढणीची लगबग सुरू असतानाच सायंकाळी पुन्हा जोरदार पाऊस व गारपीट झाली. यामुळे काढलेला कांदा शेतातच भिजून वाया गेला आहे. कांद्याचे आगर असणाऱ्या तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात उन्हाळ कांदा प्रमुख पीक असून चालूवर्षी महागडे कांदा बी, रासायनिक खते व सततच्या ढगाळ वातावरणामुळे बुरशीनाशकाची फवारणी व मजुरीचा आणि इतर भरमसाठ खर्च करून परिपक्व झालेला कांदा काढणीची धावपळ सुरू असतानाच अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. पावसाने कांद्याच्या शेतात पाणी साचल्याने काढणीस तयार असलेला कांदा जमिनीतच सडण्याची दाट शक्यता आहे. (Latest Maharashtra News)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com