Vikram Gokhale : दिग्गज अभिनेत्याच्या जाण्याने राजकीय वर्तुळ हळहळले

Vikram Gokhale Death : चित्रपटसृष्टीसह राजकीय क्षेत्रातून अनेकांनी श्रद्धांजली अर्पण केली.
Vikram Gokhale
Vikram Gokhalesarkarnama
Published on
Updated on

Vikram Gokhale Death : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं आज (दि.२६ नोव्हेंबर) निधन झालं. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीसह राजकीय वर्तुळ देखील शोकाकूल झालं. त्यांना चित्रपटसृष्टीसह राजकीय क्षेत्रातून अनेकांनी श्रद्धांजली अर्पण केली.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उद्धव ठाकरे, चंद्रकांतदादा पाटील, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक नेत्यांनी शोक व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण केली.

नितीन गडकरींनी विक्रम गोखले यांच जाणं हे कला विश्वाची मोठी हानी असल्याचं म्हटलं.'मराठी व हिंदी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली, अशा शब्दात गडकरींनी श्रद्धांजली अर्पण केली.

''ज्येष्ठ कलाकार विक्रम गोखले यांनी अभिनय एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला. एकापेक्षा एक सरस भूमिकांमधून त्यांनी उत्कृष्ट अभिनयाचे मापदंड प्रस्थापित केले. अलीकडेच त्यांची प्रत्यक्ष भेट झाली, परंतु दुर्दैवाने ती भेट शेवटची ठरली. या महान कलाकाराला भावपूर्ण श्रद्धांजली'', अशा भावना राज्यपालांनी व्यक्त केल्या.

Vikram Gokhale
बोम्मईंचा सोलापूरवर दावा; आंदोलन करत, दौंड-कर्नाटकच्या बसला काळे फासणाऱ्यावर गुन्हा दाखल

''आपल्या चतुरस्त्र अभिनयाने मराठी व हिंदी रंगभूमी तसेच चित्रपटसृष्टीत व रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाने दुःख झाले. त्यांच्या जाण्याने चित्रपट क्षेत्राचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!” असे ट्वीट करत मुख्यमंत्री शिंदेंनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

''मराठी आणि हिंदी अशा दोन्ही सिनेसृष्टी गाजविणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाने सिनेमाजगत आणि नाट्यसृष्टीचे कधीही भरुन न निघणारे नुकसान झाले. एक चतुरस्त्र अभिनेता, दिग्दर्शक, नाट्य कलावंतच नाही, तर व्यक्ती म्हणून सुद्धा मोठ्या मनाचे, व्यापक सामाजिक भान असलेले हे व्यक्तिमत्त्व! भारदस्त अभिनेता, देहबोली आणि डोळ्यातून भाव व्यक्त करण्याचे त्यांचे कसब आणि आत्मविश्वासी बाणा हे क्वचितच कुणाला लाभले!', अशा शब्दात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भावना व्यक्त केल्या.

Vikram Gokhale
बारणे अन् आढळरावांची मुख्यमंत्री शिंदेंच्या दौऱ्याला दांडी; दोघांनीही दिले 'हे' कारण

''ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाचे वृत्त अतिशय वेदनादायी आहे. रंगभूमी, चित्रपट आणि दूरचित्रवाणी तिन्ही माध्यमांतून विक्रम गोखले यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. त्यांच्या निधनाने मराठी रंगभूमी व चित्रपटसृष्टीतील एक संवेदनशील अभिनेता हरपला''. अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

“मुळात रंगमंच, सिनेमा आणि टेलिव्हिजन या तिन्ही माध्यमांमध्ये सराईतपणे अभिनय करू शकणारे अभिनेते दुर्मिळच. त्यात अनेकदा असं जाणवत आलंय की अनेक अभिनेते तिन्ही माध्यमात उत्तम अभिनय करत असले तरी त्यांचा सर्वोत्कृष्ट अभिनय कुठल्यातरी एका प्रकारात खुलतो. पण विक्रम गोखले हे त्याला दुर्मिळ अपवाद होते. भूमिका घेताना अभिनय न करणारा आणि अभिनय करताना भूमिका जगणारा कलावंत आज आपल्यातून निघून गेला. विक्रम गोखलेंच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं अभिवादन'', अशा शब्दात राज ठाकरे यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

''एक कसदार राजबिंडा अभिनेते म्हणून विक्रम गोखले यांनी रंगभूमी गाजवली. त्यांचे जाणे चटका लावणारे आहे. मृत्यूवर मात करुन ते परत येतील असे वाटत होते. पण दुर्दैव. मी या महान अभिनेत्याला आदरांजली अर्पण करतो'', अशा भावना उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केल्या.

''ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या जाण्याने मराठी नाट्य, सिनेसृष्टीतील चालतं बोलतं विद्यापीठ हरपलं. त्यांच्या निधनाने मराठी रंगभूमीच नव्हे तर चित्रपट सृष्टीचे मोठे नुकसान झाले आहे'', अशा शब्दात चंद्रकांतदादा पाटील यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

''ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आहे. ते दर्जेदार अभिनेते होते. त्यांनी रंगभूमी तसेच रुपेरी पडद्यावर साकारलेल्या अनेक भूमिका आजही रसिकांच्या स्मरणात आहेत''. अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com