पिंपरी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे आपल्या काही आमदारांसह कामाख्या देवीचं दर्शन घेण्यासाठी गुवाहाटीला आज (ता.२६) गेले आहेत. मात्र काही मंत्री आणि त्यांचे काही नाराज आमदार न गेल्याने त्याची चर्चा सुरु झाली आहे. शिरूरचे माजी खासदार आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव (Shivajirao Adharao Patil) तसेच या शिवसेनेत गेलेले मावळचे खासदार श्रीरंग बारणे (Shrirang Barne) हे ही गुवाहाटीला गेलेले नाहीत.
शिवसेनेत (Shivsena) बंड केल्यानंतर शिंदे हे गुवाहाटीला गेले होते. तेथील कामाख्या देवीला त्यांनी नवस केला होता. तो फळाला आला म्हणून तो फेडण्यासाठी ते पुन्हा आसामला (गुवाहटी) गेले आहेत. मात्र, आढळराव व बारणे हे त्यांच्याबरोबर नाहीत. म्हणून त्यांच्याशी 'सरकारनामा'ने संपर्क केला. ते का गेले नाहीत, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
त्यावर पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे जाता आले नाही, असे बारणे यांनी सांगितले. तर, आढळराव पाटील हे दर रविवारी आपल्या निवासस्थानी जनता दरबार घेतात. अपवाद वगळता ते कधी तो चुकवित नाहीत. त्यामुळे आढळराव गुवाहाटीला गेले नसल्याचे समजले. मात्र, राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा होत आहेत.
शिंदेंच्या बंडात सामील काही आमदारांना मंत्रीपद न मिळाल्याने ते नाराज आहेत. त्यातून ते गुवाहाटीला गेले नाहीत, अशी चर्चा आहे. पण, ही शक्यता बारणे आणि आढळरावांना लागू होत नसल्याचे सांगितले जाते. कारण हे दोघे आजी, माजी खासदार आहेत. त्यामुळे ते राज्यात मंत्रीपद न मिळाल्याने नाराज होण्याचा प्रश्नच उदभवत नाही. तसेच बंडानंतर ते शिंदेबरोबर गुवाहाटीला गेले नव्हते. म्हणून ते पुन्हा तिकडे गेले नसल्याचे सांगितले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.