मुंबई : भाजपचे प्रवक्ते व आमदार अमित साटम (Amit Satam) यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे( Aditya Thackeray) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. "आदित्य ठाकरे यांनी विश्वासघाताने युतीधर्म तोडून, हिंदुत्वाशी तडजोड करून सत्तेत आलेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये पितृकृपेने पर्यावरण खात्याचं मंत्रीपद पदरात पाडून घेतलं होतं, अशा शब्दात साटम यांनी हल्लबोल केला. (Latest Marathi News)
तुम्ही मंत्रीपदावर असताना केलेल्या 'कर्तृत्वामुळे' आता न्यायालयानेच महाराष्ट्र सरकारला तब्बल १२ हजार कोटी दंड ठोठावला आहे. त्यासाठी तुमचे अभिनंदन. मुंबईकरांच्या जीवाला हानिकारक असलेला घनकचरा आणि सांडपाण्याची विल्हेवाट न लावता आल्याने हरित लवादने हा दंड ठोठावला. एकप्रकारे तुमच्या कर्तृत्वावर शिक्कामोर्तब झालं म्हणा, असा खोचक टोलाही साटम यांनी आदित्य यांना लगावला.
साटम म्हणाले, मुंबईसाठी क्लायमेट अॅक्शन प्लॅनच्या भूलथापा मारण्याशिवाय आणि जनतेच्या पैश्यावर परदेश दौरा करण्याशिवाय आपण काहीही साध्य केले नाही. मलमिश्रीत काळेपाणी समुद्रात सोडून मुंबईच्या समुद्राला मात्र तुम्ही काळासमुद्र करून दाखवलं आहात, आपले कर्तृत्व एवढेच की ‘ब्लॅक सी’ पाहण्यासाठी मु्बईकरांना युरोपात जाण्याची गरज नाही. कारण तो आपण मुंबईकरांना इथेच करून दाखवलं आहे, आपल्या कर्तृत्ववान कामगिरीसाठी, आपले परत एकदा अभिनंदन, असेही साटम म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.