Aditya Thackeray Bihar Visit : आदित्य ठाकरेंचा बिहार दौरा; एका दगडात मारले तीन पक्षी!

Aditya Thackeray Bihar Visit : बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची भेट घेणार आहेत.
Aditya Thackeray
Aditya ThackeraySarkarnama

मुंबई : 'भारत जोडो' यात्रेतील सहभागानंतर आता शिवसेना नेते आदित्य ठाकरे बिहार दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात ते बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची भेट घेणार आहे. मात्र, ठाकरे यांच्या बिहार दौऱ्यामागे आगामी काळात होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीतील मतांची जुळवाजुळव आणि भाजपविरोधातील रणनीती हे देखील कारणं असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

आदित्य ठाकरे बिहार दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात ते तेथील प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत. या दौऱ्यात त्यांच्यासोबत खासदार अनिल देसाई,प्रियंका चतुर्वेदी हे नेतेही असणार आहेत. शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाकडून या दौऱ्याबाबतची पत्रकाद्वारे माहिती देण्यात आली आहे.

आता आदित्य ठाकरे यांच्या बिहार दौर्यामागे नेमकं काय राजकीय गणितं आहेत याविषयी राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मात्र, या दौऱ्यामागे आगामी काळात होणाऱ्या मुंबई पालिका निवडणुका हे देखील एक प्रमुख कारण असण्याची शक्यता आहे.

Aditya Thackeray
राष्ट्रवादीच्या बादशहा शेखचा ठावठिकाणा मिळालाय; पोलिस त्याला लवकरच पकडतील...

मुंबईसह राज्यातील अनेक महापालिकांच्या प्रलंबित निवडणुकांचा कार्यक्रम लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. यात भाजपनं यापूर्वीच मुंबई महापालिका जिंकण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. तसेच भाजपच्या प्रमुख नेत्यांनी मुंबई शहरात मोठ्या संख्येने असणाऱ्या उत्तर भारतीयांच्या मतांसाठी मेळावे, विविध कार्यक्रमांना हजेरी लावत आहे.

आता आदित्य ठाकरे बिहार दौऱ्यावर जात असून त्यात ते बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची भेट घेणार आहेत. या भेटीतून ठाकरे हे महापालिका निवडणुकीसाठी उत्तर भारतीयांच्या मतांची राजकीय समीकरणं साधण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या दौऱ्याद्वारे ठाकरे गटाकडून मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपसमोर तगडं आव्हान उभं करण्याचा प्रयत्न आहे.

Aditya Thackeray
Municipal Corporations : महापालिकांची नव्याने होणार प्रभाग रचना; चार सदस्यांचा प्रभाग!

भाजपने शिवसेनेत मोठी बंडखोरी घडवून आणत उद्धव ठाकरेंच्या पक्षाची मोठी वाताहत केली होती. यानंतर उद्धव ठाकरे यांनी सातत्याने केंद्र सरकार, मोदी यांच्यासह भाजपवर सडकून टीका केली होती.

काही महिन्यांपूर्वीच बिहारमध्ये देखील जेडीयूने भाजपशी काडीमोड घेतल्यानंतर जनता दलाशी युती करून सत्ता स्थापन केली होती. त्याच पार्श्वभूमीवर आता आदित्य ठाकरेंनी एकप्रकारे बिहार दौऱ्याद्वारे भाजपला डिवचण्याचा आणि शह देण्याचा प्रयत्न केला असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या बिहार दौऱ्याला महत्व प्राप्त झाले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com