Aditya Thackeray : आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री शिंदेंना मोठं चॅलेंज; 'राजीनामा द्या अन्...'

Uddhav Thackeray Shivsena : शिंदे यांची रडायची ही गोष्ट काही नवीन नाही. ती जुनीच आहे. रडायचे आणि काहीतरी पदरात पाडून घ्यायचे..
Aditya Thackeray
Aditya ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Thane Political News : हिम्मत असेल तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा. चांगले काम केले असेल तर लोक तुमच्यावर विश्वास टाकतील, तुम्हाला निवडून देतील. आमदारकीचा राजीनामा द्या, माझ्यासमोर उभे रहा, मी तुमच्याच मतदारसंघात तुमच्यासमोर लढायला तयार आहे, असे जाहीर आव्हान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, माजी मंत्री आदित्य ठाकरेंनी दिले आहे.

आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी रविवारी ठाणे दौऱ्यावर असताना घोडबंदर येथील आनंदनगर येथील शाखेला भेट दिली. त्यानंतर येथे झालेल्या सभेत त्यांनी मुख्यमंत्र्यांना लढण्याचा पुनरुच्चार केला. यावेळी ठाणे लोकसभेचे खासदार राजन विचारे, माजी उपमहापौर नरेश मनेरा आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, आदित्य यांनी मुख्यमंत्र्यांचा रडण्याचा पाढा जाहीर सभेत वाचला. तसेच आदित्य ठाकरे यांनी सध्याच्या परिस्थिती पाहून आता ठाणे ही गुजरातला विकला जाण्याची भीतीही यावेळी यांनी व्यक्त केले.

Aditya Thackeray
Asaduddin Owaisi Vs Prakash Ambedkar : ओवेसींचा थेट 'बडे भाई'च्या मतदारसंघातूनच एल्गार...

मुख्यमंत्री शिंदेंनी कोल्हापुरातून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) सडकून टीका केली होती. त्याचा समाचारही आदित्य यांनी यावेळी घेतला. ते म्हणाले, ते गेले असतील, पण ठाणे तसेच शिवसेनेचे राहिले आहे. पूर्वी भाजपवाले खोटे बोलायचे, आता शिंदेही बोलतात. शिंदे यांची रडायची ही गोष्ट काही नवीन नाही. ती जुनीच आहे. रडायचे आणि काहीतरी पदरात पाडून घ्यायचे, अशी त्यांची सवय आहे. आता लोक त्यांना ओळखू लागले आहेत. आता सर्व काही असताना तुम्ही का रडता, असा सवालही करत ठाकरेंनी शिंदेंवर पलटवार केला.

भाजपने 2022 मध्ये शिवसेना फोडली, 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस फोडली आणि आता 2024 मध्ये काँग्रेस फोडत आहे. त्यातच भाजपकडून गाजराशी काही मिळाले आहे का, असा सवाल यावेळी त्यांनी उपस्थित केला. राज्यातील सर्वात गरीब शेतकरी म्हणून मुख्यमंत्र्यांना संबोधताना त्यांची गावी पाच वर्षापूर्वी किती जागा होती आणि आता किती जागा वाढली आहे. हे पाहा. त्यांच्या शेतात दोन हेलिकॉप्टर उतरतील अशी व्यवस्था आहे. तसेच हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) अमावस्या आणि पौर्णिमेला शेती करतात, असा टोलाही आदित्य ठाकरेंनी लगावला.

(Edited by Sunil Dhumal)

Aditya Thackeray
Konkan Politics : ठाकरे गट आमदाराच्या ऑफिसमध्ये दगड अन् शिगांचा खच; भाजप नेत्याच्या आरोपाने खळबळ...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com