Konkan Politics : ठाकरे गट आमदाराच्या ऑफिसमध्ये दगड अन् शिगांचा खच; भाजप नेत्याच्या आरोपाने खळबळ...

Konkan Political News : "ज्यांची भाषा सगळ्याना माहिती आहे, ते भाजपच्या संस्कृतीवर टीका करतात..."
Konkan Politics
Konkan PoliticsSarkarnama
Published on
Updated on

Konkan News : कोकणात चिपळूण येथे भाजप नेते निलेश राणे व भास्कर जाधव गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. दोन्ही बाजूकडून दगडफेक झाली. पोलिसांना अश्रूधुराचा वापर करावा लागला. आता या सगळ्या विषयावरून भाजपाचे माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी भास्कर जाधव यांच्यावरती थेट निशाणा साधला आहे. ठाकरे गटाच्या आमदाराच्या कार्यालयातच दगड व शिगा जमवण्यास सुरवात झाली, असाही खळबळजनक आरोप माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी केला आहे. (Latest Marathi News)

Konkan Politics
Solapur NCP : चारच दिवसांपूर्वी अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश अन्‌ थेट महापौर होण्यासाठी शुभेच्छा!

जिल्हाभरातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना एकत्र करून मुंबई गोवा महामार्गावर असलेल्या कार्यालयात जमून लोकप्रतिनिधी हातवारे करतात, कार्यकर्त्यांना चिथावणी देतात, पोलिसांनासुद्धा वाटेल ते बोलतात. श्री देवी शारदा मातेच्या देवळातील ज्यांची भाषा सगळ्याना माहिती आहे, ते भाजपच्या संस्कृतीवर टीका करतात. म्हणजे या चोराच्या उलट्या बोंबा आहेत, अशा शब्दात भाजपाचे माजी आमदार डॉक्टर विनय नातू यांनी भास्कर जाधव यांच्यावरती थेट निशाणा असायला आहे.

Konkan Politics
BJP Politics News : मोदींचं नाव घेत भाजप नेत्यानं कमलनाथ यांच्याविरोधात फडकावलं निशाण   

गेले अनेक दिवस गुहागर तालुक्यात भाजपच्या कार्यकर्त्यांसाठी जनतेवरती अन्याय होत होता. याकरता मोठी सभा होत आहे. जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे आणि हे लक्षात आल्यावर नेता या सभेला कसा पोहोचणार नाही. या सभेमध्ये अडचण कशी आणता येईल? याकरता ठाकरे गटाच्या आमदाराच्या कार्यालयातच दगड व शिगा जमवण्याची सुरवात झाली. चिथावणी भाषा वापरली आणि या सगळ्याचे फोटो व्हिडिओ आहेत. त्यांचे शहर प्रमुख दगडफेकताना दिसत आहेत असा मोठा आरोप नातू यांनी केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ठाकरे गटाचा (Uddhav Thackeray) आमदारच आपल्या ऑफिसमध्ये दगडांचा खच दाखवून, माझ्या ऑफिसवर दगडफेक झाली असं दाखवण्याचा प्रयत्न करायचा आणि मग मला काहीतरी बोलले म्हणून असं सांगत सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करायचा. अशा या लोकप्रतिनिधीची पध्दत सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे.

Konkan Politics
NCP Politics : आमदार अमोल मिटकरींनी कुणाची केली रामायणातील मंथरेशी तुलना?

ज्या लोकप्रतिनिधीने कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. पोलिसांबाबत (Police) अर्वाच्य भाषा वापरली. दगडफेकीला सुरुवात केली या सगळ्याची सखोल चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, या सगळ्याचे रेकॉर्डिंग आहेत. योग्य ती कारवाई करून पोलिसांना काम करण्याची मोकळीक द्यावी, अशी मागणी भाजपाचे गुहागरचे माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com