Aaditya Thackeray : इतर नेते गाढ झोपेत असताना आदित्य ठाकरे यांचे सकाळी भाष्य; मिंधे सरकार त्या आयुक्ताला बढती देणार !

IAS Transfer : शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी बृन्हमुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल यांच्या बदलीबद्दल खळबळजनक दावा करत राज्यातील महायुतीच्या सरकारला घेरले आहे.
Eknath Shinde, Aaditya Thackeray
Eknath Shinde, Aaditya ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Loksabha Election 2024 : भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या दणक्यानंतर राज्य सरकारने तेरा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. केंद्रीय निवडणूक आयोगाने बृन्हमुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल यांना हटविल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतरदेखील अद्याप बृन्हमुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल यांच्या बदलीची फाइल मूव्ह झाली नाही.

त्यामुळे राज्य सरकार भारत निवडणूक आयोगाच्या आदेशाचे पालन करत नसल्याचे एकूण चित्र निर्माण झाले आहे. बदलीचे आदेश दिल्यानंतरदेखील राज्य सरकार बदली करणार नसेल तर भारत निवडणूक आयोग राज्य सरकारला त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देऊ शकते. या प्रकरणात आता शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी पुन्हा उडी घेतली आहे.

राज्याचे वरिष्ठ सनदी अधिकारी या बदली प्रकरणात नाहक अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राजकीय नेत्यांच्या राजकारणात अधिकाऱ्यांचा मात्र या बळी जाण्याची चिन्हं निर्माण झाली आहे. त्यात आज सकाळीच शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी बृन्हमुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल यांच्या बदलीबद्दल भाष्य करत या विषयावरून राज्य सरकारला घेरले आहे.

राज्यातील तेरा सनदी अधिकाऱ्यांच्या बदलीच्या यादीत डाॅ. इकबाल सिंह चहल यांचे नाव नसल्याने त्या विषयावरून राज्य सरकार निवडणूक आयोगाचेदेखील आदेश पाळत नसल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे. या सर्व प्रकरणात आता निवडणूक आयोग काय कारवाई करते हे पाहण्यासारखे असेल.

आयुक्त पदावर भूषण गगराणी, अनिल डिग्गीकर, डाॅ. संजय मुखर्जी यांची नावे निवडणूक आयोगाकडे पाठविली असल्याची माहिती आहे. आज या विषयावर निवडणूक आयोग निर्णय घेत असताना आदित्य ठाकरे यांनी त्यात उडी घेत शिंदे सरकारवर जोरदार टीका केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Eknath Shinde, Aaditya Thackeray
Lok Sabha Election 2024 : 'संभाजीनगरवर पुन्हा भगवा फडकू दे..' ; उद्धव ठाकरेंचे भद्रा मारोतीला साकडे!

मुंबई महापालिकेतून हटविण्यात आलेल्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांची मुंबई मेट्रो रेल्वे काॅर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ठाण्याचे पालिका आयुक्त अभिजित बांगर यांची मुंबई महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे.

भारत निवडणूक आयोगाने दणका दिल्यानंतर राज्य सरकारने मंगळवारी तेरा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. नवी मुंबई पालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांची सहकार व निबंधक आयुक्तपदी बदली करण्यात आली. त्याचप्रमाणे पृथ्वीराज बी. पी. यांची पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

अश्विनी भिडे यांची अतिरिक्त पालिका आयुक्तपदी नियुक्ती झाल्यानंतरही त्यांच्याकडे मुंबई मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार होता. आता त्यांच्याकडे पूर्णवेळ जबाबदारी देण्यात आली आहे.

भारत निवडणूक आयोगाने यांनी बृन्हमुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल यांची बदली करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले आहे. पण, अद्याप त्यांची बदली केल्या गेली नाही. त्यामुळे आज राज्यातील महायुती सरकारवर आदित्य ठाकरे सकाळी सकाळी बरसले आहे.

त्यांनी राज्यातील सरकारला पुन्हा मिंधे सरकार म्हणत डिवचले आहे. बृन्हमुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल यांची बदली न करता राज्य सरकार त्यांची बढती करू शकते, असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला आहे. भाजप पुरस्कृत खोके सत्ताधाऱ्यांचे बृन्हमुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल या भ्रष्ट आयुक्तांवरचं प्रेम, अचंबित करणारं आहे.

अशी जहरी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे. निवडणूक आयोगाने त्यांची हकालपट्टी केली असली तरी मिंधे सरकारने त्यांची बदली करण्यास नकार दिला, असा दावा ठाकरे यांचा आहे. डॉ. इकबाल सिंह चहल यांची मुख्यमंत्री कार्यालयात बदली होईल की त्यांना दिल्लीला पाठवले जाईल ? असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी विचारला आहे.

इतक्यावर आदित्य ठाकरे थांबले नाही तर त्यांनी गेल्या 2 वर्षांत मुंबईची ज्या प्रकारे लूट झाली आहे, ते पाहता भाजप-मिंधे सरकारने नक्कीच त्यांना ( डॉ. इकबाल सिंह चहल) बढती देण्याची शिफारस केली असावी, असा दावा ही शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

R

Eknath Shinde, Aaditya Thackeray
Congress Politics : दिल्लीत काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांची मॅरेथॉन बैठक; उमेदवारांची यादी होणार फायनल

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com