Aditya Thackeray On Sudhir Mungantiwar : वाघनखांच्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरेंनी मंत्री मुनगंटीवारांवर पंजाच मारला!

Maharashtra Assembly Session 2024 : भाजप नेते मंत्री सुधीर मुनगंटीवार महाराष्ट्रात आणत असलेली वाघनखं ही शिवकालीन नसल्याचे इतिहास तज्ञ आणि लंडनमधील वस्तू संग्रहालयाने म्हटले आहे. यानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले असून माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे युके दौऱ्याचा हिशोब मागितला आहे.
Aditya Thackeray
Aditya ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : लंडनमधून वाघनखं आणण्याच्या मुद्द्यावरून माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी भाजपचे नेते मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर आखाच्या आख्खा आरोपांचा पंजा मारला. लंडनमधील वस्तू संग्रहालयाने वाघनखं हे शिवकालीन नसल्याचा दाखला दिला.

यानंतर आदित्य ठाकरे यांनी मंत्री मुनगंटीवार यांच्या गेल्या वर्षीच्या युके दौऱ्यावरून चांगलेच आक्रमक झाले.मुनगंटीवार यांनी दहा दिवस सरकारी पैशातून 'युके'चा दौरा केला आहे,त्यांनी जनतेसमोर येऊन हिशोब द्यावा, असे आदित्य ठाकरे यांनी म्हंटले आहे.

भाजप नेते मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) हे लंडनमधील वस्तू संग्रहालयातून आणत असलेली वाघनखं शिवकालीन नसल्याचे समोर येत आहे. तसेच साताऱ्यामधील इतिहास तज्ञ इंद्रजीत सावंत यांनी देखील ही वाघनखं शिवकालीन नसल्याचे म्हटले आहे. यानंतर विरोधक भाजप सत्ताधाऱ्यांविरुद्ध चांगलेच आक्रमक झालेत. आदित्य ठाकरे यांनी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या गेल्या वर्षीच्या युके दौऱ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत.

Aditya Thackeray
Video Aditya Thackeray : आदित्य ठाकरेंनी केलं अंबानी कुटुंबीयांच कौतुक, म्हणाले आमचा त्यांना विरोध नाहीच !

आदित्य ठाकरे म्हणाले,'लंडनमधील व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट वस्तुसंग्रहालयानेच राज्य सरकार मागत असलेली वाघनखं ही शिवकालीन आहेत की, नाही याचा दाखला देत नाही. तसे वस्तुसंग्रहालयाकडून देखील स्पष्ट करण्यात आले आहे की, ही वाघनखं शिवकालीन नाहीत म्हणून मग भाजप नेते तथा मंत्री सुधीर मनगुंटीवार हे गेल्यावर्षी दहा दिवस युकेच्या दौऱ्यावर होते.

तेथील सर्व वस्तुसंग्रहालयांमध्ये फिरणार होते. वस्तुसंग्रहालयातून जे- जे शिवकालीन साहित्य आहे, ते महाराष्ट्रात घेऊन येणार होते. त्याला आता एक वर्ष होऊन गेले आहे. सरकारी पैसा वापर झालेला आहे. मग या दहा दिवसाच्या दौऱ्याचा सुट्टीचा महाराष्ट्राला काय फायदा झाला त्यांनी समोर येऊन जनतेला सांगावं, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली.

Aditya Thackeray
Aaditya Thackeray News : वरळीतील 'हिट अँड रन' प्रकरण म्हणजे खून; मुख्यमंत्री बोलत नाहीत, उपमुख्यमंत्र्यांना निबंध..?

सुधीर मुनगंटीवार गेल्यावर्षी लंडन दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी त्यांनी तिथून शिवकालीन वाघनखं आणि जगदंबा मातेची तलवार महाराष्ट्रात आणणार असल्याची घोषणा केली होती. या संदर्भात लंडन सरकार बरोबर करार देखील झाला होता. परंतु घोषणेला एक वर्ष होऊन गेली, तरी कार्यवाही झाली नाही. महाराष्ट्रात आणण्यात येणाऱ्या वाघ नखांवर मतमतांतरे आहेत.

ती वाघनखं शिवकालीन नसल्याची माहिती समोर येत आहे. राज्यातील इतिहास तज्ञांचे म्हणणे देखील तसेच आहे. यातच लंडनमधील वस्तुसंग्रहालयाने देखील तसा दुजोरा दिलाय. त्यामुळे विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी याच मुद्द्यावरून मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या युके दौऱ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

इंद्रजीत सावंत प्यादं

दरम्यान, भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी इतिहास तज्ञ इंद्रजीत सावंत यांच्या दाव्यावर आक्षेप घेतला आहे. इंद्रजीत सावंत हे महाविकास आघाडीचे प्यादं असल्यास आमदार राणे यांनी म्हटले. हीच वाघनखं महाविकास आघाडी सरकारच्या काळात आणायचे ठरले असते, तर इंद्रजीत सावंत यांनी हा आक्षेप घेतला असता का? असा सवाल केला. इंद्रजीत सावंत यांनी यांच्या पुस्तकाचे प्रकाशन कोणाच्या हस्ते होते हे संपूर्ण दुनियाला माहीत आहे. त्यामुळे इंद्रजीत सावंत यांच्या आक्षेपाला अर्थ उरत नाही, असेही आमदार नितेश राणे यांनी म्हटले.

(Edited by : Chaitanya Machale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com