Video Aditya Thackeray : आदित्य ठाकरेंनी केलं अंबानी कुटुंबीयांच कौतुक, म्हणाले आमचा त्यांना विरोध नाहीच !

Aditya Thackeray On Ambani family : अंबानी कुटूंबाने महाराष्ट्रात खूप मोठं आणि चांगलं काम केलं आहे. यामध्ये उत्कृष्ट शाळा, हॉटेल्स आणि उद्योग त्यांनी राज्यात आणि मुंबईत उभे केले. त्यांनी अनेक तरुण-तरुणींना वर्षानुवर्ष नोकऱ्या दिल्या..
Aditya Thackeray
Aditya Thackeray Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या हळदीच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. ठाकरे यांनी अंबानी कुटुंबीयांच्या कार्यक्रमाला हजेरी लावल्यावरून त्यांच्यावर विरोधकांकडून टीका केली जात आहे.

त्यावर मंगळवारी (ता. 9 जुलै) आदित्य ठाकरे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी आमचा उद्योगपतींना विरोध नाही, तर उद्योग आणि नोकऱ्या पळवणाऱ्यांना विरोध असल्याचं म्हणत अंबानी कुटूंबियांचे कौतुक केलं आहे.

ठाकरे एकीकडे उद्योगपतींवर जोरदार टीका करतात आणि त्यांच्याच हळदीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतात, अशी टीका विरोधकांकडून केली जात असल्याचा प्रश्न पत्रकारांनी विचारताच, आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) म्हणाले 'मला याच प्रश्नाची अपेक्षा होती.' अंबानी परिवार आणि आमचे पारिवारिक संबंध आहेत ते आत्तापासूनच नव्हे तर वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि धीरूभाई अंबानी यांच्या काळापासूनचे आहेत. त्यांचे चांगले संबंध आणि मैत्री होती. आत्ताची ही आमची तिसरी पिढी आहे, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.

Aditya Thackeray
Aaditya Thackeray News : वरळीतील 'हिट अँड रन' प्रकरण म्हणजे खून; मुख्यमंत्री बोलत नाहीत, उपमुख्यमंत्र्यांना निबंध..?

अंबानी यांनी हजारो तरुणांना नोकऱ्या दिल्या

अंबानी यांनी महाराष्ट्रात खूप मोठं आणि चांगलं काम केलं आहे. यामध्ये उत्कृष्ट शाळा, हॉटेल्स आणि उद्योग त्यांनी राज्यात आणि मुंबईत उभे केले. त्यांनी अनेक तरुण-तरुणींना वर्षानुवर्ष नोकऱ्या दिल्या असं म्हणत ठाकरे यांनी अंबानी कुटुंबीयांवर कौतुकाचा वर्षाव केला.

शिवाय यावेळी त्यांनी अदानी यांचं नाव न घेता टीका केली. अंबानी कुटुंबीयांनी राज्यातील तरुणांना नोकऱ्या दिल्या. मात्र जे आतमध्ये बसले आहेत त्यांच्या मालकाप्रमाणे राज्यातील उद्योग गुजरातला पळून नेले नाही. असं म्हणत त्यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सरकार आणि अदानी यांच्यावर टीका केली.

Aditya Thackeray
Video Tejas Thackeray Dance : अंबानींच्या संगीत सोहळ्यात ठाकरेंच्या चिरंजीवाचा भन्नाट डान्स; शाहरूख अन् काजोलच्या गाण्यावर धरला ठेका

आमचा उद्योग आणि उद्योगपतींना विरोध नाही

आमचा उद्योग आणि उद्योगपतींना कधीच विरोध नाही तर केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार राज्यातील उद्योग गुजरातला पळून नेत आहेत. त्याला मात्र आमचा विरोध असल्याचे आदित्य ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले. राज्यातील तरूणांना नोकरी, व्यवसाय देणाऱ्यांना आमचा नेहमीच पाठींबा राहिला आहे, असेही ठाकरेंनी स्पष्ट केलं.

(Edited by : Chaitanya Machale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com