Aditya Thackeray : केंद्रातील भाजप सरकारच्या 'फायनान्स मॉडेल'वर आदित्य ठाकरेंचे फटकारे

Aditya Thackeray criticized the BJP government : मुंबई महापालिकेच्या कोट्यवधींच्या ठेवी कालवधी होण्यापूर्वी मोडल्यावरून युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरेंनी केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील महायुती सरकारवर टीका केली.
Aditya Thackeray 1
Aditya Thackeray 1Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : मुंबई महापालिकेच्या कोट्यवधींच्या मुदतठेवी कालावधी होण्यापूर्वी मोडल्यावरून युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी केंद्रातील मोदी आणि राज्यातील महायुती सरकारला फटकारलं आहे.

"हेच काय फायनान्स मॉडेल, असा सवाल करत मुंबईत आज गुंतवणूक येत नाही आणि ज्या आहेत, त्यावर धाडी टाकल्या जात आहे", असा टोला आदित्याठाकरे यांनी लगावला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची बीकेसीला झालेल्या सभेत मुदतठेवी (FD) साठवून ठेवायच्या नसतात आणि मुंबई महापालिकेने आता गेल्या 5 वर्षात 2360 कोटींच्या मुदतठेवी कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच मोडल्याच्या मुद्द्यावर आदित्य ठाकरेंनी भाष्य केले.

Aditya Thackeray 1
Aditya Thackeray : वरळीत भाजपकडून दहीहंडीचं आयोजन; आदित्य ठाकरेंना झालाय आनंद...

आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) म्हणाले, "देशाची आजची आर्थिक परिस्थिती बघा. मनमोहन सिंग साहेब असताना देशाची आर्थिक परिस्थिती काय होती, आणि आता काय आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार असताना उद्योग येत होते. सामाजिक काही गडबड नव्हती. अर्थचक्र कोरोना काळात बंद पडले होते. तरी देखील आम्ही गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी विविध योजना राबवून आणत होतो. आज गुंतवणूक येत नाही. ज्या गुंतवणूक आहेत, त्यावर धाडी टाकल्या जात आहे. हेच का यांचे फायनान्स मॉडेल?"

Aditya Thackeray 1
Ashish Shelar : 'पवारसाहेबांना प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही', 'मविआ'च्या आंदोलनावर भाजप नेत्याचा निशाणा

"आम्ही कारभार करत असताना मुंबईला आम्ही सरप्लसमध्ये आणले. मुंबईतील कामगार, बेस्ट, मुंबईकरांसाठी कर न वाढवता हे सर्व केले होते. भाजपच्या केंद्र सरकारच्या अर्थसंकल्प बघा, देशाची आर्थिक हालत काय झाली आहे, ते बघा. मला वाटतं हे सर्व चुकीचे आहे. तुलना करा. पीओसी विकायला निघालेत. एकाच उद्योगपती मित्रांच्या घशात घालायला निघालेत. हे आर्थिक नियोजन होऊ शकत नाही", असा टोला आदित्य ठाकरेंनी भाजप सरकारला लगावला.

मुंबई महापालिकेची आर्थिक स्थिती

मुंबई महापालिकेने गेल्या पाच वर्षात 2360 कोटींच्या मुदतठेवी कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच मोडल्या असून त्यात बेस्टला अधिदान देण्यासाठी सहावेळा मुदत ठेव मोडली आहे. तसंच एमएमआरडीएला निधी देण्यासाठीही मुदतठेवी मोडल्या आहेत. ही माहिती अधिकारात ही बाब उघडकीस आली आहे. मात्र 2020-21 आणि 2021-22 या दोन वर्षात एकदाही मुदतठेवी मोडलेल्या नाहीत. मुंबई महापालिकेच्या सुमारे 83 हजार कोटींच्या मुदतठेवी विविध बँकांमध्ये आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com