Mahavikas aghadi maha morcha : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagatsingh koshyari) आणि भाजपच्या (BJP) काही नेत्यांनी महापुरूषांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडी आणि घटक पक्षांकडून आज मुंबईत (Mumbai) महामोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये महाविकास आघाडीतील सर्वत पक्षाचे दिग्गज नेते उपस्थित होते.
मात्र या मोर्चादरम्यान चर्चा रंगली ती आदित्य ठाकरे यांच्या दिलदारपणाची. त्यांच झालं असं की आदित्य ठाकरेंनी महामोर्चाच्या व्यासपीठावर संजय राऊत (Sanjay Raut) यांना स्वत:ची खुर्ची दिली. त्यामुळे त्यांच्या या दिलदारपणाची एकच चर्चा रंगलीय.
नेमकं काय घडलं?
खरं तर राजकारणामध्ये राजकीय नेते आपली खुर्ची लवकर सोडत नाहीत. अर्थात त्यांना त्यांची खुर्ची प्रिय असती असं म्हटलं जातं. पण आदित्य ठाकरे यांच्या दिलदारपणाचा असाच एक प्रसंग आज समोर आला आहे. त्यामध्ये महाविकास आघाडीच्या महामोर्चाच्या व्यासपीठावर नेत्यासांठी खुर्च्या ठेवण्यात आले होत्या.
यावर आदित्य ठाकरे (Aditya Thackeray), बाळासाहेब थोरातांसह (Balasaheb Thorat) अनेक नेते बसले होते. मात्र संजय राऊत व्यासपीठावर आले तेव्हा एकही खुर्ची रिकामी नव्हती. त्यामुळे ते बसण्यासाठी खुर्ची शोधत होते. मात्र हेच आदित्य ठाकरे यांच्या लक्षात आलं अन् त्यांनी आपण बसलेली खुर्ची संजय राऊत यांना देत ते स्वतः उभे राहिले.
यावेळी आदित्य ठाकरेंनी संजय राऊतांना हाताला धरून खुर्चीवर बसवलं तर शेजारी बसलेल्या बाळासाहेब थोरातांनी देखील राऊतांचा हात धरून आदित्य ठाकरे यांच्या खुर्चीवर बसवलं. त्यानंतर या प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
दरम्यान, आज महाविकास आघाडीच्यावतीने (Mahavikas aghadi) मुंबईत महामोर्चा काढण्यात आला. या मोर्चा दरम्यान आघाडीतील महत्वाच्या काही नेत्यांनी भाषणं देखील केली. यावेळी उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटावर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले ''भगतसिंग कोश्यारी यांना राज्यपाल मानतच नाही.
राज्यपाल पदावरबसून कोणावरही टपल्या माराव्या हे आम्ही सहन करणार नाही. केद्रामध्ये जो बसतो, त्यांच्या घरी काम करणारा माणूस राज्यपाल पदी नको. तर स्वत:ला जे बाळासाहेबांच्या विचार पुढे घेऊन जात आहोत, असे म्हणत, ते खरंतर तोतये आहेत. या तोतयांचे विचार दिल्लीशी लाचारी करणारे आहेत. खुर्ची गेली तर बेहत्तर पण महाराष्ट्राच्या स्वाभिमान आणि अस्मितेशी तडजोड करणार नाही'', असही ते यावेळी म्हणाले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.