Video Team India Celebration Politics : 'महाराष्ट्रात टीम इंडियाच्या स्वागताला गुजरातची बस कशासाठी?' ; आदित्य ठाकरेंचा संतप्त सवाल!

Aditya Thackeray on Gujrat Bus For Team India : 'हे मिंधे सरकार गुजरातला स्वत:च सरकारही हलवेन.', असंही बोलून दाखवलं आहे. जाणून घ्या आदित्य ठाकरेंनी यांनी आणखी काय म्हटलं आहे?
Aditya Thackeray on Gujrat Bus
Aditya Thackeray on Gujrat Bus Sarkarnama
Published on
Updated on

Gujarat bus to welcome Team India in Maharashtra : टी-२० क्रिकेट विश्वचषक जिंकून विश्वविजेता ठरलेली टीम इंडिया मायदेशी परतली आहे. आधी दिल्लीत पंतप्रधान मोदींसोबत भेट आणि त्यानंतर मुंबईत भव्य आणि अभूतपूर्व असे विश्वविजेत्या भारतीय संघाचे स्वागत गुरुवारी केले गेले.

सर्वप्रथम मुंबई विमानतळावर टीम इंडियाला घेऊन आलेल्या विमानाला वॉटर सॅल्यूट दिला गेला. त्यानंतर टीम इंडियाची मुंबईतील मरीनड्राईव्ह मार्गे विजयी रॅली काढण्यात आले. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा लाखो नागरिकांनी गर्दी केली होती.

टीम इंडियाच्या खेळाडूंना या मार्गावरील भव्य अशा रोडशोसाठी खास बसची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र ती बस गुजरातची असल्याचे समोर आल्यानंतर ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी यावरून नाराजी व्यक्त करत, सवालही केला आहे.

Aditya Thackeray on Gujrat Bus
T-20 World Cup : राज्य सरकार गुजरातच्या 'आका'समोर झुकले; T-20 जल्लोषावरून नाना पटोलेंचा हल्लाबोल, नेमकं काय झालं?

मीडियाला प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरे(Aditya Thackeray) म्हणाले, आदित्य ठाकरे म्हणाले, ' हे मिंधे सरकार गुजरातला स्वत:च सरकारही हलवेन. गुजरातसमोर लोटांगण घातलेलं सरकार आहे. मी सर्व क्रिकेटर्सचं अभिनंदन करतो आणि स्वागतही करतो. तरीही मुख्य गोष्ट ही आहे की, महाराष्ट्रात टीम इंडियासाठी गुजरातची बस कशासाठी?'

एकूणच टीम इंडियाचं एकीकडे जल्लोषात स्वागत होत असताना, दुसरीकडे त्यांच्यासाठी गुजरातवरून आणलेल्या बसमुळे महाराष्ट्रातील राजकारण मात्र तापण्याची चिन्हं आहेत.

Aditya Thackeray on Gujrat Bus
Pankaja Munde : महाराष्ट्राचा भावी मुख्यमंत्री कोण? पंकजा मुंडेंची आता सावध प्रतिक्रिया, म्हणाल्या...

दरम्यान टीम इंडिया भव्य रोड शो करत वानखेडे स्टेडियमध्ये दाखल झाली. तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी स्टेडियम अगदी गच्च भरलं होतं. सर्वत्र भारत माता की जय...इंडिया...इंडिया आणि टीम इंडियाच्या विजयाबद्दल घोषणाबाजी सुरू होती. खेळाडू देखील उपस्थित हजारो भारतीयांना हात हलवून प्रतिसाद देत होते.

तर आपल्याला मिळालेलं एवढं प्रेम पाहून आनंदी झालेले टीम इंडियामधील खेळाडूंनी मैदानावर डान्स करून नागरिकांचीही पुन्हा एका मनं जिंकली. हे स्वागत अभूतपूर्व असं झाल्याच्या प्रतिक्रिया सर्वत्र उमटत आहेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com