T-20 World Cup : राज्य सरकार गुजरातच्या 'आका'समोर झुकले; T-20 जल्लोषावरून नाना पटोलेंचा हल्लाबोल, नेमकं काय झालं?

Nana Patole, Rohit Pawar Vs Maharashtra Government : विश्वकप जिंकल्यानंतर आज मुंबईत टीम इंडियाची सत्ताधारी यांनी रॅली आयोजित केली आहे. टीम इंडियाच्या मिरवणुकीच्या ताफ्यात गुजरातच्या बसेस असणार आहेत.
Nana Patole
Nana PatoleSarkarnama

Maharashtra Political News : महाराष्ट्रातील महायुती सरकार हे गुजरातच्या दोन 'आका'समोर झुकले, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. टीम इंडियाची आज मुंबईत रॅली होत आहे.

यात गुजरातच्या बसेस समावेश असल्याचा आरोप नाना पटोले, आमदार बच्चू कडू आणि आमदार रोहित पवार यांनी केला आहे. यावरून राज्य सरकावर टीकेची झोड उठवण्यात येत आहे.

T-20 विश्वकप जिंकल्यानंतर आज मुंबईत टीम इंडियाची सत्ताधारी यांनी रॅली आयोजित केली आहे. टीम इंडियाच्या मिरवणुकीच्या ताफ्यात गुजरातच्या बसेस असणार आहेत. यावरून महाराष्ट्रातील सत्ताधारी आणि विरोधक यांच्या आरोपांच्या फैरी सुरू झाल्यात. विरोधकांनी महायुती सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.

Nana Patole
Balasaheb Thorat Angry : संतापजनक! नाशिकमधील सत्ताधारी तेरा आमदार करतात तरी काय?

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गुजरात मधील 'आका'समोर हे महायुती सरकार झुकते. गुजरातच्या बसेस इथे आणून महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान यानिमित्ताने महायुती सरकारने करत आहे, असा घाणाघात केला. तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी देखील याच मुद्द्यावरून महायुती सरकारवर जोरदार टीका केली.

नाना पटोले यांनी मुंबई बेस्ट बसेस कौतुक करत देशात तापामध्ये खुल्या बसेस खूप चांगले आहेत, असे सांगितले. आंतरराष्ट्रीय पातळीवर मुंबई एक नावाजलेले पर्यटन स्थळ आहे. पर्यटनासाठी जगभरातून लोक मुंबईत येत असतात. त्यावेळेस बेस्टच्या बसमधूनच फिरतात, याकडे लक्ष वेधले.

राज्य सरकार हे गुजरात धार्जिने आहे. ते त्यांना 'आका' म्हणतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे महाराष्ट्रातील महायुती सरकारचे 'आका' आहेत. टीम इंडिया विश्वकप जिंकला आहे. त्याची रॅली मुंबईत निघत आहे. त्या रॅलीसाठी गुजरातमधून बसेस आणणे हा महाराष्ट्राचा अपमान आहे. राज्यातील महायुतीचे सरकार गुजरात आणि त्यांच्याकडून महाराष्ट्राचा असा एकदा नाही वारंवार अपमान झाला असल्याचा आरोपही नाना पटोलेंनी केली.

नाना पटोले यांच्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी देखील टीम इंडियाच्या रॅली त गुजरातच्या बसेस यांच्या सहभाग कारण्यावरून टीका केली. प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी महायुती सरकारच्या प्रकाराला एका वाक्यात उपरोधात्मक प्रतिक्रिया दिले. "गुजरातच्या बसेस चांगल्या असतील", असा टोला कडू यांनी सरकारला हाणला.

(Edited by Sunil Dhumal)

Nana Patole
Ambadas Danve : 'टेस्ट' खेळतो तसा 'ट्वेन्टी 20' खेळेन; निलंबन मागे घेतल्यानंतरही अंबादास दानवेंची नाराजी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com