Aditya Thackeray, Shrikant Shinde
Aditya Thackeray, Shrikant ShindeSarkarnama

Shrikant Shinde Vs Aditya Thackeray : 'आदित्य यांनी त्यांच्या पप्पांना प्रश्न विचारला पाहिजे'; श्रीकांत शिंदेंचा खोचक टोला

Konkan Bus from Kalyan : खासदार श्रीकांत शिंदेंच्या पुढाकारातून कोकणवासीयांसाठी ५८० बस
Published on

Mumbai Political News : नाशिक दौऱ्यावर असताना ठाकरे गटाचे नेते माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केले. 'एकीकडे राज्यातील शेतकरी अडचणीत असताना मुख्यमंत्री हेलिकॉप्टर घेऊन शेतात जातात,' अशी सडकून टीका केली. यावर शिंदे गटाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी जशास तसे उत्तर दिले आहे. 'सत्तेत असताना ते अडीच वर्षांत फक्त अडीच दिवस मंत्रालयात गेले. त्यामुळे आदित्य ठाकरेंनी त्यांच्या पप्पांना अडीच दिवसांत कशा प्रकारे सरकार चालवले, असा प्रश्न विचारला पाहिजे,' अशा खोचक शब्दांत श्रीकांत यांनी आदित्य यांच्यावर निशाणा साधला. (Latest Political News)

Aditya Thackeray, Shrikant Shinde
Dhangar Reservation Protest : धनगर आरक्षणाबाबत दोन दिवसांत निर्णय घेणार; गिरीश महाजनांची मोठी माहिती

कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुकर करण्यासाठी शिवसेनेकडून शनिवारी मोफत एसटी बसेस सोडण्यात आल्या. या चाकरमान्यांना सोडण्यासाठी खासदार शिंदे डोंबिवलीत आले होते. डॉ. शिंदे यांनी शनिवारी या बसेसना भगवा झेंडा दाखवल्यानंतर बस कोकणाकडे रवाना झाल्या. या वेळी शिंदेंना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी आदित्य ठाकरेंच्या टीकेवरून छेडले.

नाशिक येथे आदित्य (Aditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शेतामध्ये हेलिकॉप्टर घेऊन जातात. तसेच होर्डिंग बॅनरबाजीवर सरकारी पैशांची उधळपट्टी सुरू आहे. विकास काही होताना दिसत नाही, अशी टीका केली होती. आदित्य यांना प्रत्युत्तर देताना खासदार शिंदेंनी त्यांच्या पप्पांनाच प्रश्न विचारावेत, असे म्हणत आदित्य यांच्यासह उद्धव ठाकरेंनाही लक्ष केले आहे.

खासदार शिंदे म्हणाले, 'अडीच वर्षे सत्तेमध्ये असताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) फक्त अडीच दिवस मंत्रालयात गेले. यावर आदित्य यांनी त्यांच्या पप्पांना विचारला पाहिजे की, त्यांनी अडीच दिवसांमध्ये राज्याचा कारभार कसा हाकला? मला वाटतं त्यांनी आता बाहेर पडायला पाहिजे. ज्यांनी टीका केली, त्यांनी वेगवेगळ्या तालुक्यांत जाऊन लोकांना भेटल पाहिजे. ते आतापर्यंत लोकांना भेटले नाहीत. आता तरी जाऊन भेटावे. त्यामुळे मागचे सरकार आणि आताच्या सरकारमधील फरक जाणवेल. लोकांना जाऊन विचारत नाहीत तोपर्यंत त्यांना काहीही कळणार नाही', असा सल्लाही त्यांनी ठाकरेंना दिला.

Aditya Thackeray, Shrikant Shinde
Dharashiv Shivsena : धाराशिवकरांनी शिवसेनेला भरभरून दिलं; तरी जिल्ह्याची झोळी रिकामीच !

कल्याण लोकसभा क्षेत्रातून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्या पुढाकाराने कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात गणेशोत्सवासाठी तब्बल ५८० बसेस सोडण्यात आल्या. कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी शिवसेनेच्या वतीने मोफत बस सेवा देण्यात आली. परंतु येताना त्याच कोकणवासीयांची वाहन सेवा सुरळीत नसल्याने हाल होतात. यावर खासदार शिंदे म्हणाले, तशा प्रकारची सूचना आमच्याकडे आली तर त्यासाठी ही उपाययोजना करू. या वेळी भाऊसाहेब चौधरी, युवा सेना सचिव दीपेश म्हात्रे, राजेश मोरे, माजी महापौर विनिता राणे, विश्वनाथ राणे, सुजित नलावडे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

(Edited by Sunil Dhumal)

Aditya Thackeray, Shrikant Shinde
Amit Deshmukh On Cabinet Meeting : मराठवाड्याला काही द्यायचेच नव्हते, तर मग बैठक घेतली कशाला ? अमित देशमुख भडकले..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com