Mumbai News : मुंबई विद्यापीठाची दोन वर्षांपासून रखडलेल्या पदवीधर सिनेट निवडणूक होत आहे. 10 जागांसाठी ही निवडणूक होत असून 22 सप्टेंबरला मतदान होईल. या निवडणुकीत राजकीय धुरळा उडणार आहे.
आदित्य ठाकरे यांची युवासेना, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) यांच्यासह 52 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेत. या निवडणुकीत युवासेना आणि 'ABVP' आमने-सामने येणार असल्याने ही निवडणूक गाजणार असल्याचे संकेत आहेत.
मुंबई विद्यापीठाच्या पदवीधर सिनेट निवडणुकीत आदित्य ठाकरेंची (Aditya Thackeray) युवासेना आणि ABVP मध्ये थेट सामना रंगणार असल्याचे चित्र आहे. युवासेना आणि ABVP ने सर्व 10 जागांवर आपपाले उमेदवार दिले आहेत. या निवडणुकीत छात्रभारतीने 4, मनसेने (MNS) 1 उमेदवार उतरवला आहे. शिवेसना एकनाथ शिंदे यांच्या युवासेने एकही उमेदवार सिनेटच्या निवडणुकीत उतरवलेला नाही. अपक्ष म्हणून 4 जणांनी अर्ज भरले आहेत.
10 जागांसाठी ही निवडणूक होत असून 22 सप्टेंबरला मतदान होणार आहे. उमेदवारी दाखल करण्याची 12 ऑगस्टच्या शेवटची दिवशी तब्बल 30 उमेदवारी अर्ज दाखल झाले. निवडणुकीच्या रिंगणात आता 52उमेदवार आहेत. 26 ऑगस्टपर्यंत अर्ज मागे घेण्याची तारीख असणार आहे.
मुंबई विद्यापीठ सिनेट पदवीधरच्या खुल्या 5 जागांसाठी 25 जणांचे अर्ज दाखल झालेत. सर्वात कमी अनुसूच जमातीच्या 1 जागेसाठी जागेसाठी 4 आणि त्यासोबत डीटी-एनटी प्रवर्गांच्या 2 जागेसाठी 5 अर्ज दाखल झाले आहेत. अनुसूचित जाती, ओबीसी आणि महिला प्रवर्गासाठी राखीव असलेल्या प्रत्येकी 1 जागेसाठी 6, असे एकूण 52 अर्ज दाखल झाले आहेत.
युवासेना उमेदवार : प्रदीप सावंत, मिलिंद साटम,परम यादव,अल्पेश भोईर,किसन सावंत,स्नेहा गवळी, शीतल शेठ, मयूर पांचाळ, धनराज कोहचडे, शशिकांत झोरे
'ABVP'चे उमेदवार : हर्षद भिडे, प्रतीक नाईक, रोहन ठाकरे, प्रेषित जयवंत, जयेश शेखावत, राजेंद्र सायगावकर, निशा सावरा, राकेश भुजबळ, अजिंक्य जाधव, रेणुका ठाकूर
'MNS' उमेदवार : सुधाकर तांबोळी
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.