Assembly Election 2024 : मोठी बातमी! दिवाळीनंतर विधानसभेचे फटाके फुटणार?

Maharashtra Politics : नवीन विधानसभा नोव्हेंबर महिन्यात अस्तित्वात येणार आहे. पण, सध्या तरी आयोगाकडून निवडणुकीबाबत कोणत्याही हालचाली सुरू नाहीत.
devendra fadnavis eknath shinde ajit pawar nana patole uddhav thackeray sharad pawar
devendra fadnavis eknath shinde ajit pawar nana patole uddhav thackeray sharad pawarsarkarnama
Published on
Updated on

लोकसभेनंतर होणाऱ्या विधानसभेकडे महायुती आणि महाविकास आघाडीचं लक्ष लागलं आहे. लोकसभेतील यशानंतर महाविकास आघाडीचा 'कॉन्फिडन्स' डबल झाला आहे. तर, पराभवानंतर 'कमबॅक' करण्यासाठी महायुतीनं देखील दंड थोपटले आहेत.

पण, विधानसभेची आचारसंहिता कधी लागू होणार? निवडणूक कधी होणार? नवीन विधानसभा कधी अस्तित्वात येणार? याबाबत निवडणूक आयोगाकडून कोणतेही संकेत मिळाले नाहीत. यातच दिवाळीनंतर विधानसभेचे फटाके फुटण्याची शक्यता आहे.

ऑक्टोबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात विधानसभेचं बिगुल वाजेल, असं मानलं जात होते. मात्र, ही निवडणूक दिवाळीनंतर म्हणजेच नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच, तिसऱ्या आठवड्यात महायुती की महाविकास आघाडीचं सरकार येणार? हे स्पष्ट होईल.

devendra fadnavis eknath shinde ajit pawar nana patole uddhav thackeray sharad pawar
Assembly Election 2024 : महाराष्ट्रातील निकालामुळे केंद्रातील सरकार पडणार, माजी मुख्यमंत्र्यांचा मोठा दावा

नवीन विधानसभा 26 नोव्हेंबर 2024 रोजी अस्तित्वात येणार आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात पाऊस पडतो. शेतीची कामे, सणासुदीचे दिवस आहेत. त्यामुळे दिवाळीनंतर निवडणूक घ्यावी, असा सूर महायुतीत ( Mahayuti ) आहे. पण, आयोगात निवडणुकीबाबत कोणतीही हालचाल नसल्याचं सांगण्यात येत आहे.

14 किंवा 15 नोव्हेंबरला निकालाची शक्यता

निवडणूक आयोगानं ( Election Commission ) आचासंहिता लागू केल्यानंतर 45 दिवसांनी नवीन विधानसभा अस्तित्वात येणे अपेक्षित आहे. 26 नोव्हेंबरला नवीन विधानसभा अस्तित्वात येणार आहे. त्यापूर्वी 45 दिवस म्हणजे 12 ऑक्टोबरला आचारसंहिता लागू झाली तर कालमर्यादेत निवडणूक प्रक्रिया पूर्ण होऊ शकते. दिवाळी 3 नोव्हेंबरला संपणार आहे. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात मतदान होईल. 14 किंवा 15 नोव्हेंबरला निकाल येऊ शकतो. त्यानंतर नवीन आमदारांच्या शपथविधीसाठी 12 दिवस हाती राहतात.

devendra fadnavis eknath shinde ajit pawar nana patole uddhav thackeray sharad pawar
Assembly Election 2024 : महाराष्ट्रातील निकालामुळे केंद्रातील सरकार पडणार, माजी मुख्यमंत्र्यांचा मोठा दावा

महायुती सरकारला आणखी दोन महिने मिळू शकतात...

लोकसभेत जनतेनं अस्मान दाखविल्यानंतर विधानसभेच्या दृष्टीनं महायुती सरकारनं मोठ्या घोषणा केल्या आहेत. त्यात 'लाडकी बहीण,' 'लाडका भाऊ', तीन गॅस मोफत आणि शेतकऱ्यांबाबतच्या काही योजनांचा समावेश आहे. यातील काही योजनांचा लाभ मिळत आहे, तर काही लागू होणार आहेत. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात आचारसंहिता लागू झाली तर योजनांचा लाभ मिळू शकला नसता. तसेच, सरकारला योजनांची प्रसिद्धी करता आली नसती.

यासह दोन महिने निवडणूक लांबल्यावर आणखी काही निर्णय आणि महत्त्वकांक्षी प्रकल्पांचे भूमिपूजन महायुती सरकारला करता येणार आहे. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यात निवडणूक घ्या, अशी विनंती महायुतीकडून आयोगाला केली जाण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com