Aaditya Thackeray News: आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण ईडीच्या रडारवर; 15 ठिकाणी छापेमारी...

ED Action On Aaditya Thackeray Close Person : आदित्य ठाकरे यांचे जवळचे मानले जाणाऱ्यांच्या चेंबूर, गोवंडी या ठिकाणी देखील ईडीने छापेमारी
ED Action On Aditya Thackerya Close Person
ED Action On Aditya Thackerya Close PersonSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : महाविकास आघाडीचं सरकार असताना कोव्हीड काळामध्ये लाईफलाईन कंपनीचा (LIfeline Company Scam) कथित घोटाळा केला गेला असा आरोप केला जात आहे. यासंदर्भात भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी युवा सेना प्रमुख माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या निकटवर्तीय समजले जाणारे सूरज चव्हाण (Suraj Chavhan) यांना कोविड सेंटरचे (Covid Center) कंत्राट दिले होते, असा आरोप केला होता. याच आरोपांची चौकशीसाठी ईडीचेकडून जवळपास १५ ठिकाणी धाडी टाकण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

तसेच, सुजीत पाटकर यांच्याशी संबंधित प्रकरणांमध्ये आता ईडीकडून सकाळीच छापेमारी करण्यात आली आहे. सुजीत पाटकर हे शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांचे निकटवर्तीय समजले जातात. कोव्हीड काळातील लाईफलाईन कंपनीच्या घोटाळा प्रकरणात ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पंधरापेक्षा अधिक ठिकाणी ईडीची छापेमारी सुरू आहे. अनेक जण सध्या ईडीच्या रडारवर आहेत, अशी ही माहिती मिळत आहे. (ED Raid On Sujeet Patkar )

ED Action On Aditya Thackerya Close Person
Shivendraraje Vs Udayanraje Bhosale Dispute: विरोध डावलून शिवेंद्रराजेंनी नारळ फोडला; उदयनराजे सातारकरांपुढे उघडे पडले

यानंतर आता याप्रकरणामध्ये कोव्हीड काळात मुंबई महानगरपालिकेवर कार्यरत असलेले सनदी अधिकारी संजीव जैस्वाल यांच्या निवसस्थानीही ईडीची धाड पडल्याची माहिती मिळत आहे. संजीव जैस्वाल हे मुंबई महापालिकेचे तत्कालिन अतिरीक्त आयुक्त होते.

ईडीची ही कारवाई सकाळी सात वाजेपासून सुरू झाली आहे. अनेक जण आज ईडीच्या रडरवर आहेत. कोव्हीडच्या काळात लाईफलाईन कंपनीच्या माध्यमाच्यासंबंधी जे काही लोक आहेत, त्यांच्यावर ईडी कारवाई करू शकते. कोव्हीड प्रकरणातील काही घोटाळ्यामध्ये या कंपनीतील काही जणांचा समावेश आहे, असा ईडीचा कयास आहे.

ED Action On Aditya Thackerya Close Person
Shivendraraje Vs Udayanraje Bhosale Dispute: विरोध डावलून शिवेंद्रराजेंनी नारळ फोडला; उदयनराजे सातारकरांपुढे उघडे पडले

ईडीने आज एकूण ऐकूण १५ ठिकाणी छापेमारी सुरू आहे. कोविडच्या दरम्यान कथित घोटाळा प्रकरणात फाइल्स ज्या कुणाच्या वतीने हाताळल्या गेल्या, अशा महानगरपालिकेतील तत्कालीन अधिकाऱ्यांचा यामध्ये प्रामुख्याने समावेश आहे. त्यापैकी एक म्हणजे संजीव जैस्वाल कोव्हीडपूर्वी ठाणे महापालिका आयुक्त म्हणून कार्यरत होते. त्यानंतर त्यांना मुंबई महापालिका आतिरिक्त आयुक्तपदावर आणण्यात आले. यांची आता या कथित कोव्हीड घोटाळ्याप्रकरणी चौकशी होत आहे.

आदित्य ठाकरे यांचे जवळचे मानले जाणाऱ्यांच्या चेंबूर, गोवंडी या ठिकाणी देखील ईडीने छापेमारी केली आहे. सुजीत पाटकर यांच्यासोबतच आता तेव्हा कार्यरत असलेले इतर तत्कालीन मनपाचे आणखी काही अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलण्यात येणार आहे. सायंकाळपर्य़ंत ईडीच्यावतीने याबद्दल माहिती देण्यात येईल, अशी शक्यता आहे

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com