Silver Oak Attack : ॲड. सदावर्तेंचा पोलिस कोठडीतील मुक्काम वाढला; १३ तारखेपर्यंत रवानगी

एसटीच्या आंदोलक कर्मचाऱ्यांचे वकिल ॲड. गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांचा जामीन अर्ज न्यायालयाने आज (ता. ११ एप्रिल) पुन्हा फेटाळला.
Gunaratna Sadavarte
Gunaratna Sadavartesarkarnama
Published on
Updated on

मुंबई : ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ या निवास स्थानी झालेल्या हल्ल्याप्रकरणी एसटीच्या आंदोलक कर्मचाऱ्यांचे वकिल ॲड. गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांचा जामीन अर्ज न्यायालयाने आज (ता. ११ एप्रिल) पुन्हा फेटाळला. न्यायालयाने ॲड. सदावर्ते यांची पोलिस कोठडी येत्या १३ तारखेपर्यंत वाढवली आहे. या प्रकरणी आणखी चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यातील एकाचे नाव सच्चिदानंद पुरी असे आहे. (Adv. Gunaratna Sadavarte remanded in police custody till April 13)

सच्चिदानंद पुरी हा ॲड. सदावर्ते यांच्या जवळचा व्यक्ती आहे. तोच एसटीच्या संपकरी कर्मचाऱ्यांना सदावर्ते यांचा निरोप पोचवायचा. पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याच्या कटात पुरी या सहभाग असल्याचे पोलिस तपासात पुढे आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे सदावर्ते यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

Gunaratna Sadavarte
धाडसत्रांना घाबरत नसल्यानेच अस्वस्थ झालेल्यांनी पवारांच्या घरावर हल्ला घडवून आणला

एसटीच्या आंदोलक कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी (ता. ८ एप्रिल) पवार यांच्या मुंबईतील घरावर हल्ला केला हेाता. त्याच रात्री गावदेवी पोलिसांकडून सदावर्ते यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर ता. ९ एप्रिल रोजी न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. ती संपल्यानंतर आज पुन्हा न्यायालयात उभे केल्यानंतर १३ तारखेपर्यंत पोलिस कोठडी वाढविण्यात आली आहे. दरम्यान, सिल्व्हर ओक परिसरातून ताब्यात घेण्यात आलेल्या ११० आंदोलक कर्मचाऱ्यांचाही जामीन अर्ज फेटाळून लावत न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे.

Gunaratna Sadavarte
सदावर्तेंना आता विविध ठिकाणी फिरवणार? ताब्यात घेण्यासाठी सातारा पोलिस मुंबईत

पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर सदावर्ते यांनी ‘माझी हत्या होऊ शकते. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याविरोधात माझ्या पतीने तक्रार दिलेली आहे,’ असा आरोप केला होता. त्यानंतर सदावर्ते यांच्या पत्नी ॲड. जयश्री पाटील यांनी ही ‘जमिनीच्या गैरव्यवहारसंदर्भात आम्ही जी तक्रार मलबार हिल पोलिस ठाण्यात दिली होती. त्यानंतर राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) माझा सुमारे १०० पानांचा जबाब लिहून घेतला आहे. त्याचा बदला घेण्यासाठीच ॲड. सदावर्ते यांच्यावर हा वैयक्तीक हल्ला करण्यात येत आहे. पोलिस यंत्रणेचा गैरवापर करून सदावर्ते यांना टार्गेट केले जात आहे, असा आरोप केला हेाता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com