सदावर्तेंना आता विविध ठिकाणी फिरवणार? ताब्यात घेण्यासाठी सातारा पोलिस मुंबईत

Gunratna Sadavarte यांच्यावर सातारा शहर पोलिस Satara city police ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे. मराठ आरक्षणाच्या Maratha reservation अनुषंगाने त्यांनी एका वृत्तवाहिनीवर तेढ निर्माण होईल, असे वक्तव्य केले होते.
Gunaratna Sadavarte
Gunaratna Sadavartesarkarnama
Published on
Updated on

मुंबई/ सातारा : डॉ. गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून त्याप्रकरणी त्यांना ताब्यात घेण्यासाठी सातारा पोलिस मुंबईत दाखल झाले आहेत. मात्र, मुंबई न्यायालय कोणता निर्णय देणार त्यावर सर्व काही अवंलबून आहे. खासदार शरद पवार यांच्या सिल्वर ओक निवासस्थानावर हल्लाप्रकरणी सदावर्ते सध्या मुंबई पोलिसांच्या ताब्यात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या मुंबईतील 'सिल्वर ओक' या निवासस्थानावर हल्लाप्रकरणी ॲड. गुणरत्न सदावर्ते सध्या संशयित आरोपी म्हणून मुंबई पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली होती. त्यांची कोठडी आज संपणार असल्याने त्यांना मुंबई न्यायालयात हजर करण्यात आले आहे. ही माहिती समजल्यावर सातारा शहरचे पोलिस अधिकारी व कर्मचारी सदावर्तेंना ताब्यात घेण्यासाठी मुंबईत दबा धरून बसले आहेत.

Gunaratna Sadavarte
Silver Oak Attack : ॲड. सदावर्ते यांना दीड तासाच्या चौकशीनंतर अटक; ‘ही’ लावली कलमे!

सदावर्ते यांच्यावर सातारा शहर पोलिस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे. मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने त्यांनी एका वृत्तवाहिनीवर बेताल वक्तव्य केले होते. तेढ निर्माण होईल, असे ते वक्तव्य असल्याने एका व्यक्तीने त्यांच्याविरोधात सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. दीड वर्षापूर्वी दाखल असलेल्या गुन्ह्यात त्यांच्यावर कारवाई झालेली नव्हती. आज त्यांना या गुन्ह्यात ताब्यात घेण्यासाठी सातारा पोलिस मुंबईत जाऊन थांबले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com