Mangesh Chivte Interest In Politics: अभिमन्यू पवार, सुमित वानखेडेंनंतर आता 'या' माजी स्वीय सहाय्यकांच्या आमदारकीची चर्चा

Solapur Politics: राजकीय नेते मंडळीचे जवळचे सहकारी, निकटवर्तीय सक्रीय राजकारणात येण्याचा ट्रेंड तसा काही नवीन नाही.
Mangesh Chivte Interest In Politics
Mangesh Chivte Interest In PoliticsSarkarnama
Published on
Updated on

Mangesh Chivte News: राजकीय नेते मंडळीचे जवळचे सहकारी, निकटवर्तीय सक्रीय राजकारणात येण्याचा ट्रेंड तसा काही नवीन नाही. राज्याच्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक राहिलेले अभिमन्यू पवार यांनी २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीतून राजकारणात एंट्री झाली. त्यांच्यानंतर श्रीकांत भारतीय यांचीही विधानपरिषदेवर वर्णी लागली. यांच्यानंतर फडणवीसांचे विशेष कार्य अधिकारी म्हणून काम पाहणाऱ्या सुमित वानखेडे यांनाही भाजपने वर्धा लोकसभेची जबाबदारी सोपवली आहे.

फडणवीस यांच्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनाही सक्रीय राजकारणाचे वेध लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. याच कारण म्हणजे सोलापूरसह राज्यात ठिकठिकाणी मंगेश चिवटे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात लागलेले पोस्टर्स.

Mangesh Chivte Interest In Politics
Thackeray Vs Shinde: मुंबईत राजकारण तापलं; सुवर्णा कारंजेंच्या नावावर ठाकरे गटाचा हातोडा

१५ जून रोजी मंगेश चिवटे यांचा वाढदिवस झाला.त्यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईसह राज्यातील सर्व जिल्ह्यामंध्ये मंगेश चिवटे यांच्या शुभेच्छांचे पोस्टर्स लावण्यात आले होते. चिवटे यांच्या समर्थकांनीही जिल्ह्या जिल्ह्यात त्यांचे पोस्टर्स लावल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. (Maharashtra Politics)

विशेष बाब म्हणजे, . विधानपरिषदेसाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून तेव्हा चिवटे यांचे नाव स्पर्धेत असल्याची माहिती भाजपच्या एका वरिष्ठ नेत्यानेच दिली होती. त्यामुळे चिवटे आता सक्रिय राजकारणात उतरणार का आणि आपल्या शिलेदाराला राजकारणात आणण्यासाठी एकनाथ शिंदे आपली ताकद लावणआर का, असाही सवाल उपस्थित होऊ लागला आहे. (Political News)

Mangesh Chivte Interest In Politics
Sharad Pawar News : 'बीआरएस' पक्ष हा राज्यातील सत्ताधारी भाजपची ‘बी’ टीम ; शरद पवारांचा गंभीर आरोप

-कोण आहेत मंगेश चिवटे?

मंगेश चिवटे हे पूर्वाश्रमीचे पत्रकार असून त्यांनी मुंबईतील अनेक वृत्तवाहिन्यांसाठी काम केलं आहे.

पत्रकार म्हणून काम करत असतानाच त्यांनी गोरगरीब रुग्णांसाठीही काम करण्यास सुरुवात केली.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना २०१५ साली त्यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाची संकल्पना मांडली.

२०१७ साली मंगेश चिवटे यांनी पूर्णवेळ आरोग्य क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला.

मंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची स्थापना केली

या कक्षाच्या प्रमुखपदाची जबाबदारीही चिवटे यांच्यावर सोपवण्यात आली

ठाण्यातून सुरू करण्यात आलेल्या शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या राज्याच्या २७ जिल्ह्यांमध्ये या कक्षाच्या शाखा सुरू करण्यात आल्या

गेल्या वर्षी झालेल्या ऐतिहासिक सत्तांतरानंतर मंगेश चिवटे यांच्यावर मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाची जबाबदारी सोपवली.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com