Sharad Pawar News : 'बीआरएस' पक्ष हा राज्यातील सत्ताधारी भाजपची ‘बी’ टीम ; शरद पवारांचा गंभीर आरोप

Sharad Pawar On BRS : 'बीआरएस'चा फटका बसण्याची शक्यता...
Sharad Pawar On BRS :
Sharad Pawar On BRS :Sarkarnama
Published on
Updated on

कैलास शिंदे

Jalgaon : तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचा बीआरएस पक्ष मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात अतिशय आक्रमकरित्या सक्रिय झाला आहे. मेळावे, शिबीरे, बैठका, दौरे यांच्यासह भेटीगाठींना मोठा वेग आला आहे. महाराष्ट्रातील त्यातल्या त्यात मराठवाड्यातील प्रमुख राजकीय पक्षांच्या नेतेमंडळींनी 'बीआरएस'मध्ये प्रवेश केला आहे. यामुळे आगामी काळात बीआरएस हा पक्ष महाराष्ट्रातील राजकारणात सत्ताधाऱ्यांह विरोधीपक्षांचेही डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी 'बीआरएस'विषयी मोठं विधान केलं आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ग्रंथालय सेलच्या अधिवेशनानिमित्ताने शरद पवार (Sharad Pawar) हे जळगाव जिल्ह्यातील अमळनेर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी आमदार एकनाथ खडसे,अनिल भाईदास पाटील उपस्थित होते. पवार म्हणाले, तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचा बीआरएस पक्ष हा राज्यातील सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पक्षाची ‘बी’टीम असल्याचा आरोप पवार यांनी केला आहे.

Sharad Pawar On BRS :
Sharad Pawar News : दोन लोकसभेसाठी पवार कोणता मंत्र देणार?

पवार काय म्हणाले..?

शरद पवार यांनी राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. यावेळी ते म्हणाले, मागच्या निवडणुकीत आम्हाला वंचित आघाडीचा मोठा फटका बसला होता. त्यामुळे यावेळीही बीआरएस(BRS) पक्षाला महाराष्ट्रात आणण्याची खेळी राज्यातील सत्ताधाऱ्यांची असावी असं आम्हांला वाटतं. त्यामुळे बीआरएस हा पक्ष सत्ताधाऱ्यांची ‘बी’ टीम असण्याची शक्यता आहे.

'बीआरएस'चा फटका बसण्याची शक्यता...

हे अगोदर विरोधी पक्षाकडे आले. त्यांनी आम्हाला साथ देण्याचे आवाहन केलं होतं. मात्र, आता ते वेगळीच चाल खेळत आहे. ते महाराष्ट्रात येत असतांना काँग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचीच लोकं फुटत आहे. त्यामुळे ही राज्यातील सत्ताधाऱ्यांची चाल असू शकते. मागच्या वेळी आम्हाला वंचित आघाडीचा फटका बसला. यावेळी बीआरएसचा फटका काही प्रमाणात बसू शकतो असं वाटतं.

Sharad Pawar On BRS :
BRS In Maharashtra : तेलंगणातील शेतकरी आत्महत्या शून्यावर, आता महाराष्ट्राची स्थिती बदलण्यासाठी सर्व निवडणुका लढणार; 'बीआरएस'चा एल्गार...

कायदा सुव्यवस्था धोक्यात

राज्यात कायदा सुव्यवस्था धोक्यात आल्याचा आरोप शरद पवार यांनी केला, ते म्हणाले, कि राज्यात काही दिवसापूर्वी दहा ते पंधरा ठिकाणी कायदा हातात घेतला जात असल्याचे दिसून आले आहे. राज्य सरकारने याची जबाबदारी घेवून सामंजस्य निर्माण केले पाहिजे.

महाराष्ट्रात खोक्याचा वापर

मध्यप्रदेश,गोवा येथे आमदार फोडून भाजप(BJP) ने आपले राज्य आणले. तसेच महाराष्ट्रातही मविआ सरकार पाडण्यासाठी खोक्यांचा वापर करण्यात आल्याचा गंभीर आरोपही यावेळी पवार यांनी केला आहे.

Sharad Pawar On BRS :
Congress President News : प्रदेशाध्यक्षपदासाठी चव्हाण-पटोलेंमध्ये रस्सीखेच? नेत्यांच्या 'दिल्लीवारी'ने चर्चांना उधाण !

नाफेड,सीसीआयने कापूस खरेदी करावी

राज्यात अद्यापही ५० टक्के कापूस शेतकऱ्यांच्या घरात असल्याचे सांगून शरद पवार म्हणाले, यामुळे शेतकरी आर्थिक संकटात आला आहे, सोयाबीनच्या बाबतही हीच स्थिती आहे.शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची ग्वाही सरकारने दिली होती. मात्र, आज हमी भाव देखील शेतकऱ्यांना मिळत नाही.

कापसाचे पेमेंट शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे,नाफेडला कापूस खरेदीसाठी पुढे आणल पाहिजे, किंवा सीसीआय मार्फत खरेदी केली पाहिजे.शेतकऱ्यांना कापसाचे अनुदान देवून त्यांना मदत केली पाहिजे.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com