Palghar Loksabha Constituency : पाच वर्षानंतर पालघर पुन्हा भाजपकडे? देवेंद्र फडणवीसांचे संकेत!

Palghar BJP and Shivsena : दुसरीकडे शिंदे गटात मात्र थोडी उदासीनता दिसू लागली आहे.
Palghar Lok Sabha Constituency
Palghar Lok Sabha ConstituencySarkarnama
Published on
Updated on

Loksabha election 2024 : पालघर मतदार संघातून महायुतीत उमेदवार ठरता ठरत नव्हता. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास अवघे दोन दिवस बाकी असताना मंगळवारी हा मतदार संघ पाच वर्षानंतर पुन्हा भाजपकडे येणार असल्याचे संकेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याने भाजपच्या गटात आनंद व्यक्त करण्यात येत आहे. तर दुसरीकडे शिंदे गटात मात्र थोडी उदासीनता दिसू लागली आहे.

पालघर लोकसभा मतदार संघ हा तसा भाजपचा गड म्हणून ओळखला जात होता. हा मतदार संघ निर्माण झाल्यावर झाललेली पहिली निवडणूक बहुजन विकास आघाडीने जिंकली होती. परंतु त्यांतर मात्र या मतदार संघावर भाजपचे वर्चस्व राहिले होते. मागच्या निवडणुकीत शिवसेनेने हा मतदार संघ भाजपकडून मागून घेतला होता. मतदार संघ भाजपच्या देवेंद्र फडणवीसांनी(Devendra Fadnavis) शिवसेनेला देताना त्यावेळचे भाजपचे खासदार राजेंद्र गावित यांनाही शिवसेनेत पाठवले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Palghar Lok Sabha Constituency
Eknath Shinde News : 'ठाकरेंची विकेट गेलीय, क्लिन बोल्ड', मुख्यमंत्री शिंदेंनी ठणकावले

शिवसेनेत दाखल होऊन गावितांनी उमेदवारी मिळवून हा मतदार संघ पुन्हा जिंकला होता. परंतु दरम्यानच्या काळात पालघर मधून भाजप मात्र हद्दपार झालं होतं. हा मतदार संघ सध्या एकनाथ शिंदे शिवसेनेचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांच्याकडे असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांनी याठिकाणाहून पुन्हा राजेंद्र गावित हेच उमेदवार असल्याची घोषणा निवडणुका जाहीर झाल्यावर केली होती.

त्यावेळी येथील भाजप कार्यकर्त्यांनी त्याला विरोध केला होता. महायुतीत त्यामुळे या जागेचा तिढा सूटत नव्हता. यावेळी हा मतदार संघ एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला न देता भाजपनेच लढवावा यासाठी भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. अखेर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज हा मतदार संघ भाजपकडे राहणार असल्याचे संकेत दिल्याने भाजपमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. आता भाजप पुन्हा राजेंद्र गावित यांची घर वापसी करून त्यांना उमेदवारी देते की नवीन नावाची घोषणा करते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Palghar Lok Sabha Constituency
Thane Lok Sabha Election : मला अटक व्हायची तेव्हा पहिला फोन राज ठाकरेंचा...; भेटीनंतर म्हस्केंनी सांगितली आठवण!

यातच देवेंद्र फडणवीस त्यांचे निकटवर्तीय असलेल्या विवेक पंडित यांच्या श्रमजीवी संघटनेच्या कार्यक्रमाला राजेंद्र गावित यांनी हजेरी लावल्याने तसेच दोन दिवसांपूर्वी गावित यांनी मध्यरात्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने गावित पुन्हा भाजप मध्ये दाखल होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com