Thane Lok Sabha Election : मला अटक व्हायची तेव्हा पहिला फोन राज ठाकरेंचा...; भेटीनंतर म्हस्केंनी सांगितली आठवण!

Naresh Mhaske On Raj Thackeray News : राज ठाकरेंकडे माझ्या मतदारसंघात सभांची मागणी केली आहे.
Naresh Mhaske On Raj Thackeray News
Naresh Mhaske On Raj Thackeray News Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : ठाणे लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी महायुतीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय नरेश म्हस्के यांनी शिवसेनेची उमेदवारी जाहीर झाली आहे. उमेदवारी बहाल झाल्यानंतर म्हस्के चांगलेच अ‌ॅक्टिव्ह झाले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांनी भेट घेतली आहे. या भेटीनंतर म्हस्के यांनी मीडियाशी संवाध साधला. (Latest Marathi News)

नरेश म्हस्के म्हणाले, "आमच्या महायुतीचे घटक असलेले राजसाहेब यांचा आशिर्वाद घेण्यासाठी आलो आहे. महाराष्ट्राची तरुणाई राज ठाकरे यांना मानतात. त्यांचा भरभक्कम पाठिंबा घेण्यासाठी आलो आहे. राज ठाकरे नेहमीच माझ्या पाठीशी उभे राहिले आहेत. अनेक आंदोलनांमध्ये मग ते विद्यार्थी आंदोलन असेल किंवा कोणतेही आंदोलन. मला अटक झालेली असताना पहिला फोन राज ठाकरे यांचा येत असे, अशीही आठवण त्यांनी सांगितली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Naresh Mhaske On Raj Thackeray News
Sharad Pawar News : "त्यांची लायकी नाही, मी यादी बाहेर काढली, तर...", शरद पवारांचा मुंडेंना कडक इशारा
Naresh Mhaske On Raj Thackeray News
Solapur NCP : लोकसभा निवडणुकीतून पवारांच्या राष्ट्रवादीची विधानसभेची तयारी; बडे नेते लावले गळाला

सभांची मागणी केली आहे -

'राज ठाकरेंकडे सभांची मागणी केली आहे. आम्ही ३६५ दिवस काम करतो असतो. केवळ निवडणुकांसाठी आम्ही काम करत नाही. ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांना खासदार करण्यासाठी नरेश मस्केनेच काम केलेल आहे. आजपर्यंत मी त्यांच्यासाठी काम केलं आता स्वतःसाठी काम करणार,' असेही म्हस्के म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com