Video Nana Patole : वादग्रस्त..! नाना पटोलेंचे पाय चिखलात माखले; ते काँग्रेसच्या कार्यकर्त्यांने धुतले

Vidarbh Congress : या चिखलातून मार्ग काढत पटोलेंनी संत गजानन महाराजांचे दर्शन घेतले. दर्शनानंतर आपल्या गाडीजवळ आलेल्या नाना पटोले यांचे पाय चिखलाने माखले होते.
Nana Patole
Nana PatoleSarkarnama

Akola Political News : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे पाय चिखलाने माखले होते. पटोलेंचे ते चिखलाचे पाय एका कार्यकर्त्याने धुतले आहेत. पटोलेही कार्यकर्त्यांकडून पाय धुवून घेत असल्याचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. पटोलेंच्या या कृतीमुळे महायुतीतील घटक पक्षांकडून आक्षेप घेण्याची शक्यता आहे. परिणामी या प्रकारामुळे पटोलेंवर जोरदार टीका होऊन वातावरण तापण्याची शक्यता आहे.

नाना पटोले Nana Patole सोमवारी अकोला जिल्ह्यातील वाडेगाव येथे एका कार्यक्रमासाठी गेले होते. या कार्यक्रमानंतर पटोले यांनी वाडेगावात मुक्कामी असलेल्या संत गजानन महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतले. ही पालखी येथील नानासाहेब चिंचोळकर विद्यालयाच्या मैदानावर मुक्कामी आहे. तेथे पावसामुळे मोठा चिखल झालेला आहे.

Nana Patole
Rahul Gandhi Waynad Resign : मोठी बातमी! राहुल गांधी वायनाडचा राजीनामा देणार; प्रियांका गांधींचंही ठरलं

या चिखलातून मार्ग काढत पटोलेंनी संत गजानन महाराजांचे दर्शन घेतले. दर्शनानंतर आपल्या गाडीजवळ आलेल्या नाना पटोले यांचे पाय चिखलाने माखले होते. ते पाय एका कार्यकर्त्याने आपल्या हाताने धुतले. त्यावेळी पटोलेही त्या कार्यकर्त्यांकडून पाय धुवून घेत असल्याचे दिसत आहे. यामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

Nana Patole
MB Bhanuprakash Death: कर्नाटकात इंधन दरवाढविरोधात आंदोलन करताना भाजप नेत्याचा मृत्यू

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com