Aaditya Thackeray : लोकसभेनंतर आदित्य ठाकरेंना विधानसभेचे वेध; 'राज्यात या निकालाची...'

Lok Sabha Election 2024 : आपले संविधान बदलण्याचा आणि लोकशाही संपवण्याचा भाजपचा प्रयत्न देशाने धुडकावला. आपल्या देशात अहंकाराला थारा नाही, हे निवडणुकीने सिद्ध केले आहे.
Aaditya Thackeray
Aaditya ThackeraySarkarnama

Maharashtra Political News : लोकसभा निवडणुकीत दमदार कामगिरी केल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांना आत्मविश्वास दुणावला आहे. आता या निकालाची पुनरावृत्ती राज्यात पुन्हा होणार आहे, असे म्हणत ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेंना विधानसभा निवडणुकीतही महाविकास आघाडीचा विजय पक्का असल्याचा विश्वास व्यक्त केला.

लोकसभेत आघाडीतील काँग्रेसला 14, ठाकरे गटाने 9 तर शरद पवार गटाने 8 जागा जिंकल्या आहेत. तर एनडीएला अपेक्षेपेक्षा खूपच कमी जागा मिळाल्या असून त्यांचे मिशन 45 फेल झाले. या निकालानंतर आदित्य ठाकरेंनी थेट भाजपवर सडकून टीका केली आहे. अहंकारी, हुकूमशाही वृत्तीला लोकांनी नाकारले असल्याचा दावाच आदित्य यांनी केला. त्यामुळे भाजप आणि ठाकरे गटात वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले, आपले संविधान बदलण्याचा आणि लोकशाही संपवण्याचा भाजपचा प्रयत्न देशाने धुडकावला. आपल्या देशात अहंकाराला थारा नाही, हे निवडणुकीने सिद्ध केले आहे. अहंकारी, हुकूमशाही, लोकशाहीविरोधी वृत्ती आणि आपल्या संविधानाऐवजी स्वतःच्या पक्षाची नियमावली देशावर लागू करू पाहणाऱ्यांना देशाने नाकारले आहे. दोनदा मिळवलेल्या बहुमतानंतर 240 वर आलेला आकडा, म्हणजेच जनतेने भाजपच्या एकाधिकारशाहीला दिलेला स्पष्ट नकार आहे.

महाराष्ट्रात, भाजपने आपले राज्य लुटले. महाराष्ट्राची आर्थिक ताकद, महाराष्ट्राचा स्वाभिमान संपवण्याचा प्रयत्न केला. अशा महाराष्ट्रविरोधी भाजपला महाराष्ट्रातील मतदारांनी नाकारले आहे. आता याची पुनरावृत्ती पुन्हा नक्कीच होणार असल्याचा विश्वास व्यक्त करून विधानसभा निवडणुकीतही विजय मिळवून राज्यात आघाडी सरकार स्थापन होण्याचा विश्वासही ठाकरेंनी व्यक्त केला.

Aaditya Thackeray
Pankaja Munde : कोण म्हणतं पंकजाताई खचल्या? त्या तर पुन्हा स्वारीवर निघाल्या..!

INDIA आघाडीच्या सर्व मतदारांसाठी आणि कार्यकर्त्यांसाठी, आमच्या राष्ट्रासाठी, संविधानासाठी, आपल्या लोकशाहीसाठी आपण निकराने लढलो. एक महत्त्वाचा टप्पा यशस्वीरीत्या पार केलाय. जोपर्यंत आपण ध्येय गाठत नाही; तोपर्यंत आपला लढा सुरूच राहणार आहे, असेही त्यांनी ठासून सांगितले.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com