Jayant Patil : अजितदादांचे आमदार घरवापसी करण्याच्या चर्चांवर जयंत पाटलांचं 'करेक्ट' उत्तर; म्हणाले, "माझा मोबाईल..."

Jayant Patil On NCP Ajit Pawar MLA : लोकसभेच्या निकालात जोरदार धक्का बसल्याने महायुतीतील अनेक नेत्यांची धाकधूक वाढली आहे. राज्यातील जनता फोडाफोडीच्या राजकारणाला कंटाळली असून त्यांचा भाजपसह युतीतील मित्रपक्षांवर रोष असल्याचा दावा विरोधकांकडून करण्यात येत आहे.
Ajit Patil, Jayant Patil
Ajit Patil, Jayant PatilSarkarnama

Jayant Patil On NCP Ajit Pawar MLA : राज्यात महायुतीच्या 45 प्लस जागांवर विजय मिळवण्याच्या संकल्पाला केराची टोपली दाखवत ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस या मित्रपक्षांच्या महाविकास आघाडीने निवडणुकीत जोरदार मुसंडी मारली. लोकसभेच्या निवडणुकीनंतर आता लगेच राज्यात विधानसभेचं बिगुल वाजणार आहे.

मात्र, विधानसभेपूर्वी अजित पवार गटातील काही आमदार घरवापसी करणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. याच चर्चांवर बोलताना राष्ट्रवादीचे (शरद पवार) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलेल्या सूचक वक्तव्याची जोरदार चर्चा सुरु आहे.

लोकसभेच्या निकालात जोरदार धक्का बसल्याने महायुतीतील अनेक नेत्यांची धाकधूक वाढली आहे. राज्यातील जनता फोडाफोडीच्या राजकारणाला कंटाळली असून त्यांचा भाजपसह युतीतील मित्रपक्षांवर रोष असल्याचा दावा विरोधकांकडून करण्यात येत आहे. अशातच अजितदादांच्या राष्ट्रवादीचे काही आमदार घरवापसी करणार असल्याचा दावा शरद पवार (Sharad Pawar) गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला होता. त्यामुळे आता खरंच अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधील आमदारांची घरवापसी कऱणार का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

या चर्चांसंदर्भात जयंत पाटील (Jayant Patil) यांना प्रश्न विचारला असता त्यांनी एक सूचक वक्तव्य केलं आहे. ज्याची चर्चा सध्या जोरदार सुरु आहे. गुरुवारी (ता. 6 जून) रोजी शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या निवडून आलेल्या उमेदवारांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी पत्रकार परिषदेत विजयी उमेदवारांची ओळख करून दिली. पत्रकार परिषदेत जयंत पाटील यांनी विविध विषयांवर भाष्य केलं.

यावेळी पाटील यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील आमदारांच्या घरवापसीच्या चर्चांवर प्रश्न विचारण्यात आला. काही लोक तुमच्या संपर्कात आहेत का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता जयंत पाटलांनी त्यांच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये एका वाक्यात उत्तर दिलं मात्र सस्पेन्स कायम ठेवला. "सध्या माझ्या मोबाईलचा वापर वाढला आहे, एवढच सांगतो." असं पाटील म्हणाले.

Ajit Patil, Jayant Patil
Jayant Patil : फडणवीस, अजितदादांच्या नाकावर टिच्चून 8 खासदार आणलेल्या जयंतरावांना विधानसभेचाही कॉन्फिडन्स!

तर याबाबत आम्ही आता काही भाष्य करणार नाही. पण गेल्या दोन दिवसांपासून लोकांची मनस्थिती बदलली आहे. तरीही सध्या फार घाई करणं योग्य नाही. थोडा वेळ जाऊद्या, आम्हाला महाराष्ट्रातील जनतेच्या मतांची फार काळजी आहे. आमचे अनेक आमदार गेले पण आज जनतेने लोकसभा निवडणुकीत आम्हाला चांगला कौल दिला. त्यामुळे आम्ही योग्य वेळी योग्य ते करू, असं पाटील यांनी सांगितलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com