Vasant More News : मनसेच्या वर्धापनदिनानंतर वसंत मोरे पुन्हा चर्चेत; पक्षातील विरोधकांना डिवचलं

MNS 17 th Anniversary : वर्धापन दिनामध्ये चर्चा होती, Where is Vasant More..?
Raj Thackeray News, Vasant More News, MNS News
Raj Thackeray News, Vasant More News, MNS NewsSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : मनसेचे नगरसेवक वसंत मोरे आणि स्थानिक मनसे पदाधिकाऱ्यांमधील वाद चव्हाट्यावर सर्वश्रुत आहे. मोरे यांना पुणे मनसेत अनेकदा डावलल्याचंही समोर आलं आहे. याचदरम्यान,वसंत मोरे हे मनसेच्या वर्धापनदिनानंतर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मोरे यांनी टि्वटद्वारे पक्षातील विरोधकांना डिवचलं आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 17 वा वर्धापनदिनाचा कार्यक्रम ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी मनसे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. आपल्या भाषणात भाजपसह उध्दव ठाकरे, महाविकास आघाडीसह विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. मात्र, या वर्धापनदिनानिमित्त पुन्हा एकदा मनसे नेते वसंत मोरे हे चर्चेत आले.

Raj Thackeray News, Vasant More News, MNS News
ED News : मोठी बातमी : साई रिसॉर्टप्रकरणी सदानंद कदम ED च्या ताब्यात, परबांच्या अडचणी वाढणार..

मनसे नेते यांनी एक टि्वट केलं आहे. या टि्वटमध्ये त्यांनी मनसेच्या वर्धापन दिनातील काही फोटो शेअर केले आहेत. तसेच आज वर्धापन दिनामध्ये चर्चा होती Where is Vasant More, Here is Vasant More!आणि शेजारी पण नीट बघा कोण होते अशी कॅप्शन दिली आहे.

वर्धापन दिनाच्या कार्यक्रमावेळी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची वसंत मोरे(Vasant More) यांनी भेट घेतली. यावर भाष्य करताना मोरे म्हणाले, माझ्या मुलाला जीवे मारण्याची धमकी आली याबाबत राज ठाकरेंना माहिती होती. पण त्याविषयी परत माझ्याशी चर्चा केली. तसेच या प्रकरणी मी स्वतः पुणे पोलीस आयुक्तांशी चर्चा करेल असंही ठाकरे यांनी सांगितल्याचं मोरे म्हणाले.

Raj Thackeray News, Vasant More News, MNS News
Maharashtra Budget: अतुल भोसलेंचे प्रयत्न; कऱ्हाडला ५५ कोटींचा निधी

कार्यक्रमाला तुम्ही व्यासपीठावर का नव्हता यावर मोरे म्हणाले, मी ज्या ठिकाणी बसलो होतो. तिथे आजूबाजूला दहा ते बारा खुर्च्या होत्या. स्वत: अमित ठाकरे हेही माझ्यासोबत होते. पण त्यानंतर ते उठून व्यासपीठावर गेले. पण मला उठताच आले नाही. मी नाराज वगेरै काही नाही असंही मोरे यावेळी म्हणाले.

आमच्या मुलांचं रक्त असं वाया जाऊ देणार नाही...

मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर काही दिवसांपूर्वी हल्ला झाला होता. यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले, ''त्यादिवशी घटना घडल्यानंतर मी काही बोललो नाही. मला अनेकांनी विचारलं तुम्हाला काय वाटतं? कोणी केलं असेल. एक निश्चित सांगतो, ज्याने हल्ला केला त्याला आधी कळेल आणि मग सगळ्यांना कळेल. आमच्या मुलांचं रक्त असं वाया जाऊ देणार नाही. ते राज्यासाठी काम करायला आले आहेत असंही ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com