Maharashtra Budget: अतुल भोसलेंचे प्रयत्न; कऱ्हाडला ५५ कोटींचा निधी

Atul Bhosale: कराड तालुक्यातील विविध रस्त्यांच्या कामांसाठी निधी मंजुर करावा, याबाबत अतुल भोसले सातत्याने प्रयत्नशील होते.
Atul Bhosale, Devendra Fadanvis
Atul Bhosale, Devendra Fadanvissarkarnama

Karad News : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात कराड तालुक्याला विविध विकास कामांसाठी ५४ कोटी ७८ लाखांचा निधी मंजूर केला आहे. भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अतुल भोसले यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे मंजुरी मिळाली आहे. त्याबद्दल मंत्री फडणवीस यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांचे अभिनंदन केले आहे.

कराड तालुक्यातील विविध रस्त्यांच्या कामांसाठी निधी मंजुर करावा, याबाबत अतुल भोसले सातत्याने प्रयत्नशील होते. त्यानुसार त्यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष, आमदार जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून अर्थमंत्री फडणवीस यांच्याकडे पत्रव्यवहार करुन, कामांना मंजुरी मिळावी अशी विनंती केली होती.

या मागणीची दखल घेत मंत्री फडणवीस यांनी आज थेट अर्थसंकल्पात कामांचा समावेश केला.कराड तालुक्यातील आटके टप्पा ते रेठरे बुद्रुक रस्ता, कृष्णा कॅनॉल चौक ते बनवडी फाटा रस्ता प्रत्येकी पाच कोटी, आटके कटपान मळा ते गोळेश्वर रस्त्याला तीन कोटी ५० लाख, कार्वे ते कोडोली रस्त्य्याला तीन कोटी, चचेगाव ते राष्ट्रीय मार्गाला तीन कोटी, कालेटेक फाटा – नांदगाव ते साळशिरंबे रस्त्याला दोन कोटी ८० लाख.

Atul Bhosale, Devendra Fadanvis
Dr.Bhagwat karad On Budget : मराठवाड्याच्या विकासाला बुस्टर देणारा अर्थसंकल्प..

तसेच कालेटेक कमान ते काले रस्त्याला दोन कोटी, कालेतील रस्त्याला दिड कोटी, रेठरे बुद्रुक ते खुबी ते कृष्णा कारखाना रस्त्याला एक कोटी ३० लाखासह इंदोलीजवळ पुलाला बांधकामाला १६ कोटी, उंब्रज - अंधारवाडी - चोरे - मरळी - पाल रस्त्याला सात कोटी २० लाख, पार्ले बाह्यवळण रस्त्य्याला सात कोटी, शेणोली स्टेशन रस्त्याला ४८ लाख अशा ५४ कोटी ७८ लाख रुपयांच्या विकासकामांना मंजुरी मिळाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com