Navi Mumbai Mahapalika News : शरद पवारांपाठोपाठ शिंदेंकडचे डॉ. राहुल गेठेही नवी मुंबई महापालिकेत...

Sharad Pawar and Dr. Gethe: : भरत गोगावलेंनी प्रचंड आटापिटा करून शरद पवारांना आणले होते..
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama

Navi Mumbai News : ठाकरे सरकार असो वा शिंदे-फडणवीस आणि आताचे शिंदे-फडणवीस-पवार सरकारमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोठी ‘फेव्हरेट’ ठरलेल्या डॉ. राहुल गेठेंची नवी केबीन ठरली आहे. शिंदेंचे ‘ओएसडी’ डॉ. राहुल हे आता नवी मुंबई महापालिकेत उपायुक्तपदाच्या खुर्चीत बसणार असून, तसा आदेश राज्य सरकारने काढला आहे. याच महापालिकेत शिंदेंचे आणखी एक ‘ओएसडी’ मनोज महाले हेही उपायुक्त आहेत. त्यामुळे नवी मुंबई महपाालिकेत शिंदेचे हे दोन ‘ओएसडी’ महापालिकेत कायमच शिंदेशाही सांभाळणार असल्याचे उघड आहे. (Latest Marathi News)

त्याआधी शिंदे गटाचे नेते भरत गोगावलेंनी प्रचंड आटापिटा करून शरद पवार नावाच्या एका अधिकाऱ्याला याच महापालिकेत आणून उपायुक्त केले आहे. त्यांच्याकडे प्रशासनाची जबाबदीरी देण्यात आली होती. गोगावलेंनी आणलेल्या शरद पवारांपाठोपाठ शिंदेंनी गेठेंना याच ठिकाणी धाडून महापालिकेत ‘शिंदेशाही’ बळकट केल्याचे दिसत आहे. या आणि अशा काही महापालिकांत सरकारमधील नेत्यांच्याच मर्जीतील अधिकाऱ्यांना प्रतिनियुक्ती देऊन नेमले जात आहे. ज्यामुळे महापालिकांमधील ‘प्रशासक’वर सत्ताधाऱ्यांची हुकूमत दिसून येत आहे.

Eknath Shinde
India Meeting News : राहुल गांधी वडापाव खाणार, ममतादीदी पुरणपोळीची चव चाखणार, नितीश-लालूंची जोडी बाकरवडी संपवणार..

ठाकरे सरकार पाडल्यापासून मुख्यमंत्री शिंदेंनी राज्यभरात प्रशासकावर ताबा मिळविण्याचा प्रयत्न केला. त्यातून ठाकरेंसह राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांना ‘रसद' पुरविणाऱ्या अधिकाऱ्यांना बाजूला करीत, शिंदेंनी आपल्या काही अधिकाऱ्यांना ताकद दिली. त्यात मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, पनवेल, मीरा-भाईंदर महापालिकेत लक्ष घालून अधिकाऱ्यांवर वचक ठेवला.

भाजपचे नेते, माजी मंत्री गणेश नाईकांसाठी महत्त्वाच्या नवी मुंबई महापालिकेतही शिंदेंनी ‘वजन’ वाढविले. तेव्हाचे ठाण्याचे आयुक्त अभिजीत बांगरांना ‘ठाणे’ दिल्यानंतर शिंदेही नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदाच्या खुर्चीत राजेश नार्वेकरांना बसविले. त्याआधी नार्वेकर हे ठाण्याचे जिल्हाधिकारी होते. तर शिवसेनेचे खासदार संजय राऊतांचे व्याही आहेत. तरीही, नार्वेकर हे शिंदेंच्या गोटातील मानले जातात.

नार्वेकर यांच्यानंतर या महापालिकेतील दुसरे अतिरिक्त आयुक्त विजय मसाळांना आणले. अतिरिक्त आयुक्तानंतर गोगावलेंच्या आग्रहाखातर शिंदेंनी शरद पवारांना उपायुक्त केले. त्यानंतर शिंदेंचे ‘ओएसडी’ महाले हेही महापालिकेत आले. सहा महिन्यांपूर्वी तुषार दौंडकर हेही शिंदेंच्याच एका नेत्याकडून महापालिकेत लेखापाल पदावर आले आहेत.

Eknath Shinde
MP Imtiaz Jaleel On Co-oprative Bank : आणखी एक बॅंक बुडाली, आता तरी ग्राहकांच्या पैशाची हमी द्या..

एवढ्यावर न थांबता आता डॉ. गेठेही महापालिकेत कायमस्वरुपी राहणार आहेत. याआधी कोरोना काळात डॉ. गेठे हे नवी मुंबई महापालिकेत उपायुक्त होते. मात्र, शिंदे-फडणवीस सरकारमध्ये ते मुख्यमंत्र्यांचे ‘ओएसडी’ झाले. शिंदेंभोवती राहून राजकीय, प्रशासकीय व्यवस्था कोळून प्यायलेल्या डॉ. गेठेंनी नवी महापालिकेच्या सेवेत जाणे पसंत केले.

नव्या आदेशानुसार गेठे महापालिकेत रुजू झाले आणि त्यानंतरच्या काही तासांत पुन्हा शिंदेंच्या सेवेत आले. डॉ. गेठे हे गेली १३ वर्षे शिंदेंसोबत काम करीत आहेत. ते मूळ आरोग्य खात्यात वैद्यकीय अधिकारी आहेत. कोरोनात आरोग्य व्यवस्थेत जम बसविलेल्या डॉ. गेठेंना नवी मुंबई महापालिका ‘लकी’ असल्याचे दिसत आहेत. त्यामुळेच महापालिकेच्या सेवेत कायम समावेश करीत राज्य सरकारने त्यांना नवी मुंबई महापालिकेत उपायुक्त केल्याचे स्पष्ट आहे. डॉ. गेठेंमुळे कायमस्वरुपी शिंदेंचा खास डॉक्टर महापालिकेत राहणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com