Congress Leader Meeting With Sharad Pawar : शरद पवारांसोबतच्या बैठकीनंतर विरोधी नेते टाकणार ' टॉप गिअर '...

Congress & NCP Political News : काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाच्या नेतेमंडळींकडून अधिवेशनात आपआपल्या ताकदीने किल्ला लढविण्याचे काम केले जात आहेत. पण...
Nana Patole, Sharad Pawar
Nana Patole, Sharad Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai : विधीमंडळाचे अधिवेशन सुरु होऊन दोन आठवडे होत आहेत. तरीदेखील विधानसभेचा विरोधी पक्षनेता अद्याप ठरलेला नाही. काँग्रेसने विरोधी पक्षनेतेपदावर दावा ठोकला असला तरी राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाची भूमिका गुलदस्त्यात आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाचे नेतेमंडळी आप आपल्यापरीने विधानसभेच्या सभागृहात खिंड लढवत आहे.

दुसरीकडे देशपातळीवरील मोदी सरकारविरोधातील विरोधकांची तिसरी बैठक मुंबईत होत आहे. राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच काँग्रेस नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात महत्वपूर्ण बैठक झाली आहे. पवारांसोबतच्या बैठकीनंतर महाविकास आघाडी ' टॉप गिअर' टाकणार का अशी चर्चा सुरू आहे.

काँग्रेस नेते व शरद पवार(Sharad Pawar) यांची शुक्रवारी यशवंतराव चव्हाण सेंटर येथे बैठक झाली आहे. या बैठकीला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार यशोमती ठाकूर यांच्यासह अनेक काँग्रेस नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या बैठकीत 'इंडिया'ची मुंबईतील बैठक,राज्यातील राजकीय परिस्थिती आणि मविआची पुढील रणनीती यावर चर्चा होणार असल्याची माहिती आहे.

Nana Patole, Sharad Pawar
Uddhav Thackeray News : ठाकरे गटाची गळती थांबेना; बीएमसी निवडणुकीआधी 'जोर का झटका'!

विधीमंडळाच्या अधिवेशनाचा दुसऱ्या आठवड्याचा शुक्रवारी शेवटचा दिवस आहे. मात्र, विरोधी पक्षांकडून विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाची निवड झालेली नाही. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलें(Nana Patole) सह ज्येष्ठ नेतेमंडळींकडून विधानसभेतील संख्याबळाच्या जोरावर विरोधी पक्षनेतेपदावर दावा ठोकण्यात येत आहे. यात माजी मंत्री बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण,पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले यांची नावे आघाडीवर आहेत. पण त्यापैकी कोणत्याही एका नावावर अद्याप शिक्कामोर्तब करण्यात आलेले नाही.

शिवसेनेतील उभ्या फुटीनंतर महाविकास आघाडीतील ताकदवान पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसकडे पाहिले जात होते. विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी अजित पवारांकडे होती. मात्र, शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीतही बंडखोरी उफाळून आल्यानंतर अजित पवार आमदारांचा मोठा गट सोबत शिंदे - फडणवीस सरकारमध्ये धडकले.यामुळे महाविकास आघाडी खिळखिळी झाली. याचाच फटका सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षांना बसला.

Nana Patole, Sharad Pawar
Sanjay Raut On Devendra Fadnavis : भाजप 'वॉशिंग मशीन'; राऊतांनी फडणवीसांना धू-धू धुतले

अधिवेशनात सध्या काँग्रेस, राष्ट्रवादीसह काँग्रेसच्या दिग्गज नेतेमंडळींकडून आपआपल्या ताकदीने किल्ला लढविण्याचे काम केले जात आहेत. पण अजित पवारांनतर विरोधी पक्षनेताच न सापडल्यामुळे सत्ताधारी पक्षाकडून वारंवार विरोधी पक्षांना डिवचले जात आहे. याचमुळे किमान अधिवेशनाच्या तिसऱ्या आठवड्यात तरी विरोधी पक्षनेत्याची निवड व्हावी यासाठी काँग्रेस नेते पवारांच्या भेटीला गेले आहेत. (Mahavikas Aaghadi News)

Nana Patole, Sharad Pawar
Eknath Shinde On Thackeray : वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी ठाकरेंवर मुख्यमंत्री शिंदेंचे जिव्हारी लागणारे वार; म्हणाले...

आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवत केंद्रातील मोदी सरकारविरोधात विरोधी पक्षांनी रणशिंग फुंकलं आहे. याच धर्तीवर विरोधी पक्षांची मोट बांधण्यासाठी मोठी पावले उचलली आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह उध्दव ठाकरे देखील प्रमुख चेहरे आहेत.

पाटणा, बेंगळूरु येथील बैठका आणि 'इंडिया' नावानंतर आता विरोधकांची तिसरी बैठक मुंबईत होणार आहे. या बैठकीकडे सर्वांचच लक्ष लागलेले आहे. बैठकीची जबाबदारी पवारांसह ठाकरेंवर देखील सोपवण्यात आली आहे. या बैठकीच्या तयारीच्या अनुषंगाने देखील चर्चा काँग्रेस नेते व पवार यांच्यातील यशवंतराव चव्हाण यांच्या भेटीत होण्याची शक्यता आहे.

Nana Patole, Sharad Pawar
Ahmednagar Politics : नगरमधून विधानपरिषद आमदारकीसाठी अनेकांच्या गुडघ्याला बाशिंग!

राज्यातील फोडाफोडीचं राजकारण, तपास यंत्रणांच्या कारवाईची टांगती तलवार, शेतकर्यांच्या आत्महत्या, अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान, खते- बियाणांच्या दरातील वाढ, महिलांची सुरक्षितता, कायदा- सुव्यवस्थेचे तीनतेरा यांसह विविध मुद्द्यांवरून आक्रमक भूमिका घेतानाच सत्ताधारी भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या महायुती सरकारविरोधात रणनीती कशी आखली जावी यासाठी पवार मार्गदर्शन करण्याची शक्यता आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com