वेब सिरिज पाहून बॅंकेत दरोडा टाकला...३४ कोटी चोरलेही मात्र, पुढे जे घडलं...

Crime : पैसे एसीच्या डक्टमधील छिद्रातून बँकेच्या इमारतीच्या मागील बाजूस ताडपत्रीवर फेकून दिले.
Crime News
Crime NewsSarkarnama
Published on
Updated on

डोंबिवली : बॅंक दरोडावर आधारीत मनी हिट्स ही वेब सीरिज पाहिली आणि स्वतःच्या बँकेत चोरी करण्याचा त्याने कट आखला. बॅंकेतील लॉकरमधील 34 कोटी रुपये त्याने चोरले खरे पण त्यातील 12 कोटीच त्याच्या हाती लागले.

डोंबिवली तील आयसीआयसीआय बँक मध्ये जुलै महिन्यात 34 कोटी चोरीची घटना घडली होती. बॅंकेतील कोटी रुपये लंपास करणाऱ्या टोळीचा मुख्य सुत्रधार बॅंक कस्टोडियन अल्ताफ शेख याला पकडण्यात मानपाडा पोलिसांना यश आले आहे. अल्ताफ याच्यासह त्याची बहिण निलोफर हिचा देखील यात मोठा सहभाग असून तिला देखील पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 30 कोटी रक्कम आत्तापर्यंत पोलिसांनी हस्तगत केली असून अद्याप मोठ्या गुन्हाचा छडा लागण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. (Crime News)

Crime News
संजय राऊतांचा बॅनर फाडल्याने वाद चिघळणार; पोलीस ठाण्यात तक्रार दाखल...

डोंबिवली एमआयडीसी परिसरातील आयसीआयसीआय बॅंक आहे. जुलै महिन्यात या बॅंकेतील 12 कोटी 20 लाखाची रक्कम चोरी झाल्याची घटना उघड झाली होती. बॅंकेचे चिफ मॅनेजर दिपक पाठक यांनी याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला असता तपासा दरम्यान बॅंकेत काम करणाऱ्या चेस्ट लॉकर मॅनेजर अल्ताफ शेख याने आपल्या काही साथीदारांसह ही रक्कम चोरल्याचे समोर आले होते. तसेच बॅंकेच्या आवारात 22 कोटींची रक्कम देखील सापडली होती.

या टोळीच्या मागावर पोलिस असतानाच ऑगस्ट महिन्यात टोळीतील इसरार कुरेशी, अहमद खान आणि अनुज गिरी या तिघांना अटक करत 5 कोटी 80 लाखांची रोकड जप्त केली होती. मात्र अल्ताफ शेख उर्वरित रक्कम घेऊन पसार झाला होता. अखेर पोलिसांनी तीन महिन्यांपासून चकवा देणाऱ्या अल्ताफ शेख याला कोल्हापूर येथून बेड्या ठोकल्या आहेत. अल्ताफ शेख याची बहीण निलोफरला देखील बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

Crime News
पुणे पोलिसांकडून सर्वात मोठे 'लोन ॲप रॅकेट' उध्वस्त!

मुंब्रा येथे राहणारा अल्ताफने बॅंकेत रुजु होण्यापूर्वी खासगी कंपन्यांमध्ये लिपिक म्हणून काम केले आहे. त्याच्या कामगिरीमुळे त्याला 3 वर्षात चेस्ट लॉकर मॅनेजर म्हणून बढती मिळाली. 11 वर्षात त्याची कधीही या पदावरुन बदली झाली नव्हती. वाढता घरखर्च भागविण्यासाठी झटपट पैसा कमविण्याचे विचार त्याच्या डोक्यात घोंगावत होते. त्यातच त्याने मनी हिट्स (Money Hiest) ही वेब सीरिज पाहण्यास सुरुवात केली. त्यातून त्याला स्वतः काम करत असलेल्या बॅंकेतील चोरीची कल्पना सुचली. तो कॅश कस्टोडियन मॅनेजर असल्याने त्याला बँकेविषयी सर्व माहिती होती. बँकेच्या सुरक्षा यंत्रणेमध्ये असलेली कमतरता त्याने हेरली. हा प्लॅन यशस्वी करण्यासाठी त्याने त्याचे मित्र इसरार कुरेशी, अहमद खान आणि अनुज गिरी यांची मदत घेतली. त्याने बँकेतील तिजोरी रूमच्या बाजूला असलेल्या एसी दुरुस्तीचे काम सुरू असलेले पहिले आणि त्याने संधी साधली. अगोदर सुरक्षा यंत्रणेतील त्रुटींचा अभ्यास केला आणि नंतर चोरीसाठी लागणारे साहित्य गोळा केले.

Crime News
काय सांगता! सरपंचासह ग्रामसेवकही लाच घेताना ACB च्या जाळ्यात...

9 जुलैला सुट्टीच्या दिवशी बँकेचे अलार्म निष्क्रिय करत सर्व कॅमेऱ्यांच्या हार्ड डिस्क काढून त्याने तिजोरीतून 34 कोटी रुपये लंपास केले. हे पैसे त्याने एसीच्या डक्टमधील छिद्रातून बँकेच्या इमारतीच्या मागील बाजूस बांधलेल्या ताडपत्रीवर फेकून दिले. चोरी करुन पळून जाण्याचा त्याचा इरादा नव्हता, तसेच चोरी पकडली जाऊ नये म्हणून त्याने बँकेतील सीसीटीव्हीचा डीव्हीआर गहाळ असल्याची माहिती बँकेच्या वरिष्ठांना देऊन तिजोरीतील रक्कम तपासणी करण्याचे पथक बँकेत बोलावले. एकीकडे तपासणी सुरू असताना दुसरीकडे त्याने आपले मित्र कुरेशी, अहमद खान आणि अनुज गिरी .यांना बोलवून 34 कोटींपैकी सुमारे 12 कोटी त्यांच्याकडे सोपवले. मात्र उरलेले पैसे त्याला घेता आले नाहीत.

लुटीपूर्वी अल्ताफने लुटीचा आराखडा तयार करण्यासाठी तळोजा येथे एक सदनिका स्वतःच्या व बहिण निलोफरच्या नावाने खरेदी केली होती. या ठिकाणी त्यांनी लुटलेले पैसे ठेवले होते. हे पैसे ठेवताना एका व्यक्तीने पाहिले. त्या तीन अल्पवयीन तरुणांनी त्यातील काही पैसे चोरुन ते मौज मजेसाठी खर्च केल्याचे तपासात समोर आले आहे. सीसीटिव्हीचा आधार घेत पोलिसांनी सोलापूर, पुणे आणि कोल्हापूर येथील हॉटेल्समधील त्याच्या हालचाली टिपून सापळा रचून कोल्हापूर येथील बुधवारी त्याला अटक केली. त्याची बहिण निलोफर हिला देखील सहआरोपी म्हणून अटक करण्यात आली आहे. याप्रकरणाची सखोल चौकशी सुरु असून आणखी मोठी उकल होण्याची माहिती पोलिसानी दिली आहे.

अल्ताफ चे कुटुंब मोठे आहे. तो मुंब्रा येथे आई, वडील, पत्नी, मुलीसह राहत होता. वाढता घर खर्च भागविण्यासाठी त्याने ही शक्कल लढविली. या चोरी प्रकरणात अल्ताफच्या पत्नीने पोलिसांना पूर्ण सहकार्य केले, असे पोलीस तपासात उघड झाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com