पुणे पोलिसांकडून सर्वात मोठे 'लोन ॲप रॅकेट' उध्वस्त!

Pune Police : ४८ मोबाइल, ५६ बँक खाते, ५६ संगणक, १६७ डेबिट कार्ड, असा ७० लाखांचा मुद्देमाल जप्त.
Pune Police|
Pune Police|Sarkarnama

बंगळुरू : लोन ॲपद्वारे फसवणूकीचे प्रकार वाढलेले आपल्याला दिसून येतात. लोन ॲपमधून अनेकांची आर्थिक आणि मानसिक पिळवणूक होत असते. आता पुणे पोलिसांकडून लोन ॲपच्या सर्वात मोठ्या घोटाळ्याच्या रॅकेटवर कारवाई करण्यात आली आहे. यामुळे लोन ॲपबाबत सर्वात मोठी कारवाई समोर आली आहे. (Pune Police)

पुणे पोलिसांनी कर्नाटक राज्याची राजधानी असलेल्या बेंगळुरू शहरात ही कारवाई केली आहे. बेंगळुरूस्थित लोन ॲपद्वारे लोकांची आर्थिक आणि मानसिक पिळवणूक करणाऱ्यांचे बनावट कॉल सेंटर उध्वस्त केले आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांनी आतापर्यंत १८ जणांना अटक केली. या टोळीने फ्रॉड लोन ॲपद्वारे हजारो नागरिकांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.

Pune Police|
Video : पंतप्रधान मोदींना आपला ताफा का थांबवावा लागला?

या प्रकरणी स्वप्निल नागटिळक, श्रीकृष्ण गायकवाड, धीरज पुणेकर, प्रमोद रणसिंग, मुमताज कुमठे, सॅम्युअल कंदीयल, पिता इब्राहिम मोहम्मद मनियत, पिता मोहिदू हे सर्व आरोपी या कॉल सेंटर मध्ये काम करणारे होते. येथूनच ते हे रॅकेट चालवत होत. या सर्वांना आता पुणे पोलिसांनी बेड्या ठोकत, लोन ॲपच्या सर्वात मोठ्या घोटाळ्याच्या रॅकेटवर कारवाई करण्यात आली आहे.

Pune Police|
आमदारांना माहित नसलेला पंढरीचा विकास आराखडा कुणी तयार केला : भालकेंचा हल्लाबोल

हे सर्व जण लोन अँपद्वारे कर्ज घेतलेल्या लोकांना कॉल करून अश्लील भाषेत वसूलीसाठी तगादा लावत होते. तसेच शिवीगाळ करून धमकी देण्याचे मेसेज, कॉल करण्याचे काम करत होते. अनेकांना त्रास दिला जात होता.

या सर्व आरोपींकडून एकूण ४८ मोबाइल, ५६ बँक खाते, ५६ संगणक, १६७ डेबिट कार्ड, आधारकार्ड, मतदार कार्ड यासह अनेक कागदपत्र असा ७० लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. पुणे पोलिसांकडून लोन ॲपच्या सर्वात मोठ्या घोटाळ्याच्या रॅकेट उध्वस्त केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com