Maratha Reservation : आता मरण आले तरी चालेल ; मराठा महासंघ आक्रमक, आंदोलनाकडे सरकारचा कानाडोळा

Maratha Reservation | मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळाल्याशिवाय आता मागे हटणार नाही," असा निर्वाणीचा इशारा शशिकांत पवार यांनी सरकारला दिला आहे.
maratha reservation
maratha reservationsarkarnama

मुंबई : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) अनेक मुख्य मागण्या प्रलंबित आहेत. मराठा समाजाला ओबीसींच्या कोट्यातून व एकंदर ५० टक्के आरक्षण मर्यादेतूनच आरक्षण मिळावे यासाठी उद्या (मंगळवार) ऑगस्ट क्रांती मैदानात "मुक आत्मक्लेश आंदोलन" करण्यात येणार आहे. या आंदोलनाची दखल अद्याप शिंदे सरकारने घेतली नसल्याने अखिल भारतीय मराठा महासंघ आक्रमक झाला आहे.

"मराठा आरक्षणासाठी मरण आले तरी चालेल, पण मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळाल्याशिवाय आता मागे हटणार नाही," असा निर्वाणीचा इशारा अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. शशिकांत पवार यांनी सरकारला दिला आहे.

मुख्यमंत्री मराठा आहेत, विरोधी पक्षनेते मराठा आहेत. मग या दोघांना मराठा आरक्षणासाठी पुढाकार घेण्यास काय अडचण आहे ? असा प्रश्न करून, सर्वच राजकीय पक्षांनी मराठ्यांना फसवल्याचा आरोपही पवार यांनी केला आहे. महाविकास आघाडी सरकार मराठ्यांना आरक्षण देण्यात अपयशी ठरले. त्यामुळे नव्या सरकारने तरी काहीतरी मार्ग काढला पाहिजे, असेही पवार यांनी म्हटले आहे.

maratha reservation
TET Exam Scam : मुलांचे प्रमाणपत्र रद्द ; अब्दुल सत्तारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..

काँग्रेस-राष्ट्रवादी युती तसेच भाजप-सेना युती सरकारने दिलेली आरक्षणे न्यायालयात टिकली नाहीत. महाविकास आघाडी सरकारच्या मराठा आरक्षण धोरणावर भाजप नेते नेहमीच टीका करत होते. त्यामुळे आता त्यांनी मराठा आरक्षणासाठी पुढाकार घ्यायला हवा, अशी मागणीही पवार यांनी केली आहे.

"मराठा समाजाला ओबीसींच्या कोट्यातून व एकंदर ५० टक्के आरक्षण मर्यादेतूनच आरक्षण मिळावे यासाठी नऊ ऑगस्ट रोजी (मंगळवार) ऑगस्ट क्रांती मैदानात " मुक आत्मक्लेश आंदोलन" होणार आहे. याबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना कळवूनही त्याची साधी दखलही घेण्यात आली नाही, ही मराठा समाजाची अवहेलना आहे. मला वयाच्या ८२ व्या वर्षी आंदोलन करावे लागत आहे, मात्र मी मागे हटणार नाही," असा इशाराही पवार यांनी दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com