Loksabha Election 2024 : लोकसभेची निवडणूक पाचव्या टप्प्यात आली असताना, आगरी सेनेने भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या महायुतीच्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील उमेदवारांना जाहीर समर्थन व पाठिंबा दर्शवत आहे. असे पत्र दिले आहे. त्या पत्रामध्ये देशाची सुरक्षितता, एकात्मता,अखंडता व विकासासाठी देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी असणे ही काळाची गरज आहे.असे नमूद केले आहे.
ठाणे आणि पालघर या दोन जिल्ह्यांमध्ये महायुतीच्या चारही उमेदवारांना आगरी सेनेच्या वतीने पाठिंबा जाहीर करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांच्या कामाने प्रेरित होऊन आपण हा पाठिंबा जाहीर करत असल्याची माहिती आगरी सेनेचे सरचिटणीस मेघनाथ साळवी यांनी दिली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदी यांच्याशिवाय दुसरा पर्याय उपलब्ध नाही. या कारणास्तव आपण हा पाठिंबा देत साळवी यांनी सांगितले. तर 14 मे रोजी झालेल्या आगरी सेनेच्या सर्व जिल्हयाचे पदाधिकारी व मध्यवर्ती कार्यकारीणी यांच्या बैठकीत संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी एकमताने निर्णय घेतला, असे ही पत्रात म्हटले आहे.तसेच त्या पत्रावर आगरी सेना प्रमुख राजाराम साळवी यांची स्वाक्षरी आहे.
दरम्यान,आमदार केळकर यांनी, नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी जनमानसातील सर्व वर्गाचा पाठींबा मिळत असताना आता भूमीपुत्राची संघटना असलेल्या आगरी सेनेचाही पाठिंबा लाभल्याने महायुतीची ताकद कैकपटीने वाढली असल्याचे सांगितले.
मंगळवारी ठाण्यातील टीप टॉप प्लाझा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत आगरी सेनेने आपली भूमिका स्पष्ट केली. या पत्रकार परिषदेला आमदार संजय केळकर, आगरी सेना कार्याध्यक्ष प्रदीप साळवी, भाजपाचे शहराध्यक्ष संजय वाघुले, सागर बडे आदी उपस्थित होते.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.