Sunil Tatkare : 'पहाटेच्या शपथविधी'वरुन तटकरेंचा गौप्यस्फोट; काँग्रेसचं 'ते' विधान अजितदादांच्या लागलं जिव्हारी!

Devendra Fadnavis - Ajit Pawar Oath : पहाटेच्या शपथविधीनंतर अजितदादांना व्हिलन करण्यात आल्याचा आरोप अजित पवार गटासह भाजपचे नेते करत आहेत. तर हा शपथविधी एक राजकीय खेळी असल्याचा दावा शरद पवारांनी अनेकदा केला आहे.
Sunil Tatkare
Sunil Tatkare Sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : राज्याच्या राजकारणात २०१९ आणि त्यानंतर मोठ्या घडामोडी झाल्या. त्यामुळे राज्याचे राजकारण पूर्णपणे बदलून गेले आहे. या वातावरणातही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी विसरता येत नाही. त्या शपथविधीबाबत आतापर्यंत सर्व नेत्यांनी काही खुलासे केले आहेत. आता एका खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी त्यास काँग्रेस जबाबदार असल्याचा मोठा गौप्यस्फोट केला आहे.

सुनील तटकरे Sunil Tatkare यांनी 2014 मध्ये राज्यात भाजप-शिवसेनेचे सरकार स्थापन झाले होते. त्या काळात शरद पवारांसह आम्ही सरकारमध्ये सहभागी होण्यासाठी अमित शाह Amit Shah यांच्याशी चर्चा केली होती. मात्र शिवसेना बाहेर पडली पाहिजे, अशी आमची अट होती. त्यावर अमित शाहांनी त्यास स्पष्टपणे नकार दिला. ही युती बाळासाहेब ठाकरे, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी आदी दिग्गज नेत्यांनी तयारी केली आहे. त्यामुळे ती आम्ही तोडणार नाही. ठाकरे आतच राहतील, असे ठामपणे सांगितले.

राज्यात 2019 ची निवडणूक झाल्यानंतर महिनाभर सरकार स्थापन होत नसल्याने आमची एन्ट्री झाली. त्यावेळी एकीकडे शिवसेना आणि भाजपसोबत चर्चा सुरू होती. तर दुसरीकडे काँग्रेसला सोबत घेण्यासाठीही पर्यत्न सुरू होते. सत्तेत जाण्यासाठी मुंबईतील नेहरु सेंटरमध्ये काँग्रेससोबत बैठक झाली होती. त्यावेळी उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांच्यासह अहमद पटेल, मल्लिकार्जुन खरगे आणि काँग्रेसचे राज्यातील नेते उपस्थित होते. त्यावेळी काँग्रेसने शरद पवारांच्या विश्वासार्हतेबाबत शंका उपस्थित केल्या. यामुळे आमच्या मनाला वेदना झाल्या होत्या. यातूनच अजित पवारांनी देवेंद्र फडवीस यांच्यासोबत शपथ घेतली. आणि हा पहाटेचा नसून सकाळी आठ वाजता शपथविधी झाला, असेही तटकरेंनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sunil Tatkare
Delhi Income Tax Office : मोठी बातमी ! दिल्लीत इन्कम टॅक्स ऑफिसला आग

दरम्यान, पहाटेच्या शपथविधीनंतर अजितदादांना Ajit Pawar व्हिलन करण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी अजित पवार गटातील नेत्यांसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे इतर नेते करत आहेत. तर हा शपथविधी एक राजकीय खेळी होती. त्यातून राज्यातील राष्ट्रपती राजवट उठवण्यात आली, असे मत शरद पवारांनी Sharad Pawar अनेकदा व्यक्त केले आहे. त्यानंतर आता तटकरेंनी या शपथविधीला थेट काँग्रेसलाच जबाबदार धरल्याने वाद होण्याची शक्यता आहे. त्यास काँग्रेस काय उत्तर देणार, याकडे लक्ष आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Sunil Tatkare
Sanjay Raut: ...तर एकनाथ शिंदे 2019 मध्येच मुख्यमंत्री झाले असते, राऊतांचं मोठं वक्तव्य

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com