Rohit Pawar On Sanjay Shirsat : ''सिडको'चे महापराक्रमी', असा टोला लगावला; मंत्री शिरसाटांच्या अतिवृष्टी पाहणी दौऱ्यावर रोहित पवार संतापले...

Rohit Pawar Criticizes Sanjay Shirsat Over Heavy Rainfall Inspection Tour in Ahilyanagar : एकनाथ शिंदे शिवसेना मंत्री संजय शिरसाट यांच्या अतिवृष्टी पाहणी दौऱ्यावर आमदार रोहित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे.
Rohit Pawar On Sanjay Shirsat
Rohit Pawar On Sanjay ShirsatSarkarnama
Published on
Updated on

Monsoon damage tour Maharashtra : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अहिल्यानगर जिल्ह्यातील आमदार रोहित पवार यांनी राज्यातील अतिवृष्टीवरून भाजप महायुती सरकारमधील मंत्र्यांनी काढलेल्या दौऱ्यावर निशाणा साधला आहे.

विशेष करून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांच्या अतिवृष्टीच्या दौऱ्यावर संताप व्यक्त केला आहे.

रोहित पवार यांनी मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्या अतिवृष्टी पाहणी दौऱ्याचं वेळापत्रक ट्विटरवर शेअर करत, सिडकोचे महापराक्रमी मंत्री शिरसाट साहेबांचा हा अतिवृष्टी पाहणी दौरा बघा, असे म्हणत यात अतिवृष्टीच्या पाहणीसाठी 1 तास आणि पक्ष संघटनेसाठी 6 तास राखीव आहेत. म्हणजेच शिरसाटसाहेब पक्ष संघटनेच्या बैठकीतून केवळ पाय मोकळा करण्यासाठी येणार आहेत का? ही शेतकऱ्यांची थट्टा नाही तर काय आहे? असा घणाघात केला आहे.

'हे मंत्री शेतकऱ्यांचे (Farmer) अश्रू पुसणार आहेत की, त्याच्या जखमेवर मीठ चोळणार आहेत? अशा ‘पर्यटन’ मंत्र्यांच्या दौऱ्यांची शेतकऱ्यांना कदापि गरज नाही. अशा फालतू दौऱ्यापेक्षा सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा, कर्जमाफी द्यावी आणि शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार मदत द्यावी,' अशी मागणी रोहित पवार यांनी केला.

Rohit Pawar On Sanjay Shirsat
Gunaratna Sadavarte ST Bank controversy : छत्रपती शिवाजी महाराजांसोबत नथुराम गोडसेचा फोटो; 'एसटी बँके'च्या अहवालावरून उफाळला नवा वाद

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील अतिवृष्टीच्या पाहणी दौऱ्याची घोषणा करण्यात आली आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील मंत्री पाहणी करतीलच, शिवाय मंत्रिमंडळातील प्रत्येक मंत्री अतिवृष्टीने प्रभावित झालेल्या भागाची पाहणी करतील, अशा सूचना केल्या आहेत. यानुसार मंत्री संजय शिरसाट यांनी देखील दौरा घोषित केला आहे.

Rohit Pawar On Sanjay Shirsat
Prashant Kishor Politics : प्रशांत किशोरांना आरोप करणं भोवलं; मंत्र्यानं ठोकला 100 कोटीचा मानहानीचा दावा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूर अन् सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकाळी सात वाजल्यापासूनच दौरा सुरू केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे धाराशिव दौऱ्यावर आहेत. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे देखील सकाळपासून फिल्डवर आहेत.

परंतु मंत्री संजय शिरसाट यांनी जाहीर केलेल्या अतिवृष्टीच्या दौऱ्यावर रोहित पवार यांनी निशाणा साधला आहे. मंत्री शिरसाट यांचा दौरा म्हणजे, शेतकर्‍यांची थट्टा करत आहे का? असा सवाल केला आहे. मुंबई इथून खासगी विमानाने सोलापूर इथं मंत्री संजय शिरसाट येणार आहेत. दुपारी 12 वाजता सोलापूर इथल्या करमाळा भागातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करणार आहेत. यानंतर दुपारी एक वाजता, मंत्री शिरसाट हे देवीचामाळ ग्रामपंचायतीमधील कुलस्वामिनी ग्रामदैवत श्री कमलाभवानी मंदिर इथं दर्शन आणि महापूजा करणार आहेत.

यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाशी निगडीत असलेल्या कार्यक्रमांना दुपारी दीड वाजल्यापासून ते सायंकाळी सात वाजेपर्यंत नियोजन आहे. तसे मंत्री शिरसाट यांच्या नियोजित दौऱ्यात नमूद केले आहे. त्यामुळे मंत्री शिरसाट यांचा सोलापूर दौऱ्यावर रोहित पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com