Prashant Kishor Politics : प्रशांत किशोरांना आरोप करणं भोवलं; मंत्र्यानं ठोकला 100 कोटीचा मानहानीचा दावा

Prashant Kishor Faces ₹100 Crore Defamation Suit by Minister: प्रशांत किशोर यांनी केलेल्या आरोपांमुळे बिहारचे दुखावलेले मंत्री अशोक चौधरी यांनी 100 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला आहे.
Prashant Kishor defamation case
Prashant Kishor defamation caseSarkarnama
Published on
Updated on

Prashant Kishor vs Ashok Choudhary : बिहार विधानसभा निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापलं आहे. एनडीए युती अन् इंडिया आघाडी घमासान सुरू असतानाच, राजनीतीकार अन् जनसुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर देखील आपले भविष्य आजमावत आहे.

यातून ही नेतेमंडळी वेगवेगळी विधानं करत आहेत. प्रशांत किशोर यांनी केलेल्या आरोपांमुळे बिहारचे दुखावलेले मंत्री अशोक चौधरी यांनी 100 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. मंत्री चौधरी यांच्या या भुमिकेमुळे बिहारचे राजकारण अधिक तापणार अशी चिन्हं आहेत.

मंत्री अशोक चौधरी, उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी, आरोग्य मंत्री मंगल पांडे आणि भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष खासदार दिलीप जायस्वाल यांच्यावर प्रशांत किशोर यांनी आर्थिक आणि नैतिक भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. सातवी इयत्ता अनुत्तीर्ण असताना परदेशातून 'पीएच.डी'ची खोटी पदवी मिळविणे, खुनाच्या आरोपात सहभाग, जन्मतारखेत फेरफार केल्याचा आरोप सम्राट चौधरी यांच्यावर केला आहे.

मुख्यमंत्री नितीशकुमार (Nitish Kumar) यांच्या मंत्रिमंडळातील ग्रामीण विकास मंत्री अशोक चौधरी यांच्यावर 200 कोटी रुपयांची बेनामी संपत्ती निर्माण केल्याचा आरोप आहे. प्रशांत किशोर यांनी अस्वस्थतेतून आणि भीतीपोटी केलेला आरोप निराधार आणि खोटा आहे. यातून ते जनतेची दिशाभूल करीत आहेत, असा दावा अशोक चौधरी यांनी केला.

Prashant Kishor defamation case
RSS 100 years celebration Nagpur : 'RSS'चं ऐतिहासिक शताब्दी वर्ष; रामनाथ कोविंद, गणवेशधारी 15 हजार स्वयंसेवक अन् एक लाख हिंदू संमेलन...

मंत्री अशोक चौधरी यांनी यापूर्वीही प्रशांत किशोर यांच्यावर मानहानीचा दावा दाखल केला होता. न्यायाधीशांनी किशोर यांना 17 ऑक्टोबरला न्यायालयात हजर राहण्याचा आदेश दिला होता.

Prashant Kishor defamation case
Chinas K-Visa : अमेरिकेच्या H1-B व्हिसाला टक्कर; चीनने आणलेल्या K-व्हिसाने किती फायदा होणार?

‘बिनशर्त माफी मागा’

मंत्री चौधरी यांनी प्रशांत किशोर यांच्यावर 100 कोटींचा मानहानीची नोटीस बजावली आहे. त्यानुसार किशोर यांनी सात दिवसांत पत्रकार परिषद घेऊन लेखी किंवा तोंडी बिनशर्त माफी मागावी अन्यथा त्यांच्याविरोधात फौजदारी कारवाई आणि 100 कोटींची भरपाई देण्यासाठी दिवाणी खटला दाखल करण्यात येईल, अशा इशारा चौधरी यांनी दिला आहे.

आरोपांमुळे पक्षाची बदनामी; भाजपही आक्रमक

भाजपचे माजी खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री राजकुमार ऊर्फ आर. के. सिंह यांनी आक्रमक पवित्रा घेत बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी आणि मंत्री अशोक चौधरी यांना आरोपांवर स्पष्टीकरण द्या, अथवा पद सोडा, असे सुनावले आहे.

आरा लोकसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा विजय मिळविण्यास अपयश आल्यापासून ते नाराज आहेत, माध्यमांशी झालेल्या चर्चेच्या मालिकेत ही टिप्पणी केली. ते म्हणाले, 'मी जे काही बोललो त्यावर मी ठाम आहे. मंत्र्यांवरील या आरोपांमुळे राज्यातील पक्ष आणि राज्य सरकारची बदनामी होत आहे.'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com