Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद मधील भीषण विमान दुर्घटनेत डोंबिवलीतील २७ वर्षीय रोशनी सोनघरे या हवाई सुंदरीचा मृत्यू झाला आहे. काही दिवसांपूर्वीच रोशनी गावी जाऊन कुलदैवताचे दर्शन घेऊन आजी आजोबांचा आर्शिवाद घेऊन आली होती.
गावावरुन येताच तिला लंडनची फ्लाईट मिळाली. लंडनला जाण्यासाठी ती बुधवारी अहमदाबादला आई वडीलांचा निरोप घेऊन निघाली होती. मात्र हा निरोप ठरला. रोशनच्या निधनाची बातमी तिच्या आईला सांगण्यात आलेली नाही. आईल लोबीपीचा त्रास असल्याने तिला धक्का बसेल म्हणून तिला सांगण्यात आले नसल्याचे रोशनच्या मामांनी सांगितले.
डोंबिवली पूर्वेतील म्हात्रेनगर परिसरात नव उमिया सोसायटीमध्ये रोशनी कुटूंबासह दोन वर्षापूर्वी राहण्यास आली होती. मूळचे दापोली मंडणगड येथील असलेले सोनघरे कुटुंब सुरुवातीला मुंबईतील ग्रँट रोड परिसरात 10 बाय 10 च्या घरात राहत होते. आई राजश्री, वडील राजेंद्र आणि भाऊ विघ्नेश यांच्या समवेत ती राहत होती. दोन वर्षांपूर्वीच ते डोंबिवलीत स्थायिक झाले होते. रोशनीचा भाऊ विघ्नेश एका खाजगी शिपिंग कंपनीत काम करतो आणि तिचे आईवडील घरीच असतात.
रोशनीचं शिक्षण मुंबईत झालं. रोशनीचे वडील टेक्निशियन असून मिळेल ते काम करतात. राजेंद्र सोनघरे आणि त्याची पत्नी राजश्री यांनी त्यांच्या दोन्ही मुलांना अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण दिलं. तसेच दोन्ही मुलांना त्यांच्या आवडत्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी कायमच प्रोत्साहन दिल्याचे आई सांगते.स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न
रोशनीला लहानपणापासूनच हवाई सुंदरी व्हायचे होते. हवाई सुंदरी होण्याचा तिचा ध्यास होता. मुंबईतील सरस्वती इंग्लिश माध्यमाच्या शाळेतून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने भारत कॉलेजमधून उच्च शिक्षण घेतले. कॉलेज पूर्ण होताच तिने अंधेरी येथील संस्थेतून आपले शिक्षण पूर्ण केले. यानंतर तिने 2021 मध्ये स्पाइस जेटमध्ये नोकरी केली. त्यानंतर दोन वर्षांपूर्वी रोशनी एअर इंडियामध्ये रुजू झाली. तिने तिचे स्वप्न दृढनिश्चय आणि कठोर परिश्रमाने पूर्ण केले. मात्र, स्वप्न पाहणाऱ्या आणि ती पूर्ण करण्यासाठी झगडणाऱ्या मुलीचं आयुष्य इतक्यात संपेल, याची कुणालाच कल्पना नव्हती. त्यामुळे या दु:खद घटनेने संपूर्ण परिसर शोकाकुल झाला आहे.
रोशनीचे मामा प्रवीण सुखदरे यांनी सांगितले की, छोट्याशा 10 बाय 10 खोलीत राहत असताना रोशनीने मोठं स्वप्न पाहिलं आणि ते पूर्णही केलं. अंगाखांद्यावर मोठी झालेली रोशनी लहानपणापासूनच खूप अभ्यासू आणि स्वप्नाळू होती. तिचं स्वप्न होतं एअर होस्टेस बनण्याचं. तिचे वडील टेक्निशियनचं काम करतात. घरच्यांनी मोठ्या कष्टाने तिला शिकवलं आणि तीचं स्वप्न सत्यात उतरलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.