Loksabha Election News : 'एमआयएम'चं मुंबईत धक्कातंत्र; 'उत्तर मध्य मुंबई'मधून वारिस पठाण नाही, तर 'या' नेत्याचा अर्ज

Mumbai North Central Constituency : उत्तर मध्य मुंबईतून एमआयएमने मोठी खेळी खेळतानाच रमजान चौधरी यांना उमेदवारी जाहीर केली आहे
Asaduddin Owaisi
Asaduddin OwaisiSarkarnama

Mumbai News : भाजपने यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उत्तर-मध्य मुंबईत मतदारसंघात मोठा निर्णय घेतला आहे. याठिकाणी भाजपनं विद्यमान खासदार पूनम महाजन यांचं तिकीट कापत थेट नवा चेहरा देतानाच ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर,काँग्रेसकडून वर्षा गायकवाड येथे निवडणूक लढणार आहे.

पण शुक्रवारी (ता.3) या मतदारसंघात मोठी राजकीय घडामोडी घडल्या. उत्तर मध्य मुंबईतून एमआयएमने (AIMM) मोठी खेळी खेळतानाच रमजान चौधरी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे या मतदारसंघात आता तिहेरी लढत पाहायला मिळणार आहे.

Asaduddin Owaisi
Thane Politics : ठाण्यात आज टोळीयुद्ध उद्या तुमच्या अंगावर येतील; जितेंद्र आव्हाडांचा रोख कुणाकडे?

मुंबईत हाय व्होल्टेज लढतींपैकी एक असलेल्या उत्तर-मध्य मुंबईतून ( Mumbai North Central Loksabha Constituency ) 'एमआयएम'कडून वारिस पठाण यांना उमेदवारी जाहीर होण्याची जोरदार चर्चा सुरू होती. पण या ठिकाणी एमआयएमकडून अचानक शुक्रवारी दुपारी रमजान चौधरी यांचं नाव पुढं करण्यात आले. त्यांंनी उमेदवारी अर्ज भरल्यामुळे आता उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून भाजपचे उज्जवल निकम आणि काँग्रेसच्या वर्षा गायकवाडांसह आता एमआयएमचे रमजान चौधरींमध्ये तिरंगी लढत होणार आहे.

एमआयएमने ऐनवेळी आपला पत्ता उघडताना रमजान चौधरी यांना उमेदवार जाहीर केली आहे. त्यामुळे मुस्लिम समाजाची मते चौधरी यांच्याकडे वळू शकतात. आणि याचा फटका काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांना बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'एमआयएम'चं दबावतंत्र ?

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत आता महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीकडून प्रचाराचा जोर वाढवला आहे. युती आणि आघाडीकडून छोट्या घटक पक्षांना देखील सामावून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.

याचवेळी वंचित आणि एमआयएमने स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच काही ठिकाणी पाठिंबा तर काही ठिकाणी उमेदवार देत महायुती आणि महाविकास आघाडीचं टेन्शन वाढवलं आहे.

Asaduddin Owaisi
Supreme Court News : …निवडणूक लढण्यापासून रोखू शकत नाही; कोर्टानं का घेतलं लालू अन् राहुल गांधींचं नाव?

उमेदवारांची यादी वाढणार ?

एमआयएमकडून महाराष्ट्रात सहा जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते.पण आता हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.यावर खासदार इम्तियाज जलील यांनी मोठी माहिती दिली आहे.

जलील म्हणाले, आम्ही सहा जागा लढवण्याचा ठरवलं होतं, मात्र आता इच्छुकांची संख्या वाढत आहे. त्यामुळे इच्छुकांची यादी घेऊन लवकरच हैदराबादला जाणार आहे. इच्छुकांची राजकीय माहिती,त्यांना याआधी मिळालेली मते याचा अहवाल असदुद्दीन ओवैसींना देणार आहे. स्वत:ओवैसी यांनी एक खासगी एजन्सी नेमली असून तिचा अहवाल लक्षात घेतला जाणार असल्याची माहिती जलील यांनी दिली आहे.

Asaduddin Owaisi
Asaduddin Owaisi News: 'हा' भाजपची 'बी टीम'चा शिक्का पुसण्याचा ओवैसींचा प्रयत्न तर नाही ना ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com