Manoj Jarange News : मोठी बातमी! जरांगेंवर आरोप करणाऱ्या बारसकरांवर हल्ल्याचा प्रयत्न; दोघे ताब्यात

Ajay Maharaj Baraskar Attack : पाच ते सहा हल्लेखोर असल्याची माहिती, तक्रार आल्यास गुन्हे दाखल होणार
Manoj Jarange, Ajay Maharaj Baraskar
Manoj Jarange, Ajay Maharaj BaraskarSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : मराठा आंदोलक मनोज जारांगे पाटलांविरोधात त्यांचे पूर्वीचे सहकारी असलेले अजय महाराज बारसकरांनी काही गंभीर आरोप केले आहेत. बारसकर हे वारंवार जरांगे पाटलांविरोधात भूमिका मांडत आहेत. त्यामुळे मराठा समाजातील पाटील समर्थक मराठा बांधव त्यांचा विरोध करत आहेत. त्यातच शुक्रवारी सायंकाळी चर्चगेट परिसरात बरासकरांवर काही लोकांनी हल्ल्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळीच हल्लेखोरांना अडवून त्यांना ताब्यात घेतले आहे. या हल्ल्यानंतर बारसकर यांची सुरक्षा आता वाढवण्यात आलेली आहे. (Manoj Jarange News)

बारसकरांवर (Ajay Maharaj Baraskar) हल्ला करणारे पाच ते सहा जण असल्याची माहिती मिळत आहे. त्यातील दोघांना मरीन ड्राईव्ह पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हल्ल्याप्रकरणी पोलिस त्यांची चौकशी करत असून त्यांच्यावर कुठलाही गुन्हा दाखल केला नसल्याची माहिती आहे. मात्र तक्रार आल्यास त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. दरम्यान, बारसकरांची पत्रकार परिषदत होती. मात्र हल्ला होण्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद रद्द केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Manoj Jarange, Ajay Maharaj Baraskar
Manoj Jarange Latest News : अरे जरा थांब! केंद्रीय मंत्रिपदाची गर्मी दाखवू नको; जरांगे पाटलांचा रोख कुणाकडे?

दरम्यान, बारसकरांनी जरांगे पाटील (Manoj Jarange) कुणालाही विश्वासात न घेता निर्णय घेत होते. ते दररोज निर्णय बदलत होते. ते वारंवार खोटे बोलतात. सर्व पारदर्शक आहे म्हणायचे आणि रांजणगाव, पुणे, लोणावळा आणि वाशी येथे अनेक गुप्त बैठका घेतल्या. जरांगे श्रेयवादासाठी काम करत आहेत, असे गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे मराठा आंदोलनात फूट पडल्याचे मानले जात आहे.

काय म्हणाले बारसकर?

मनोज जरांगे पाटील सरकारला कुठलेही निवेदन देत नाहीत, पण जरांगे रोज पलटतात. त्यांना कायद्याचे काहीही कळत नाही. जरांगे सामाजिक विद्वेश पसरवतात. वाशीच्या बंद खोलीत कोणते वकील, अभ्यासक होते? काय चर्चा केली? हे जरांगेंनी जाहीर करावे. वाशीत मराठा आरक्षण मिळाले म्हणून फटाके फोडले. पण, 'गुलाल घेण्यासाठी आझाद मैदानावर जायचे,' असे जरांगे म्हणाले होते. सरकारवर दबाव आणण्यासाठी जरांगेंनी वक्तव्य केली होती. मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांनी वाशीत यावे आणि पाणी पाजावे, असा अट्टहासही त्यांनी धरला होता. त्याचे पुरावे असल्याचाही दावा बारसकरांनी केला आहे.

(Edited by Sunil Dhumal)

R

Manoj Jarange, Ajay Maharaj Baraskar
Manoj Jarange Latest News : मनोज जरांगेंचा गर्भित इशारा; म्हणाले, 'सगेसोयऱ्यांच्या मुद्द्यावरून एक इंचही...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com