Manoj Jarange Latest News : अरे जरा थांब! केंद्रीय मंत्रिपदाची गर्मी दाखवू नको; जरांगे पाटलांचा रोख कुणाकडे?

Maratha Reservation Protest : मराठ्यानेच मराठ्यांची डोकी फोडली असतील तर राज्यात हे पहिल्यांदाच घडले आहे. मराठ्यांवरील हिसांचाराचे षडयंत्र एका मराठ्याच्या घरातच शिजले रचले असेल तर ते दुर्देवी
Manoj Jarange
Manoj JarangeSarkarnama

Maharashtra Political News : अंतरवाली सराटीत मराठा आंदोलकांवर दगडफेक करायला मनोज जरांगे आणि राजेश टोपेंनी सांगितल्याचे गंभीर आरोप जरांगे पाटलांचे सहकारी बाबूराव वाळेकर यांनी केला आहे. वाळेकरांचा या आरोपांचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. याला प्रत्युत्तर देताना मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील चांगलेच संतापले.

वाळेकरांचा बोलवता धनी कोण आहे, हे चांगलेच माहिती आहे. तो केंद्रीय मंत्री असून स्वतःला मराठा म्हणवतो. मराठा असूनही मराठ्यांच्या आया-बहिणीची डोकी फोडण्याची षडयंत्र रचतो. अरे जरा थांब, केंद्रीय मंत्रिपदाची एवढी गर्मी होऊ देऊ नकोस, नाहीतर मराठे चांगलाच धडा शिकवतील, असा सज्जड दमच जरांगे पाटलांनी कुणाचेही नाव न घेता दिला. यामुळे जरांगे पाटलांचा नेमका रोख कुणाकडे आहे, याचीच चर्चा सुरू झाली. (Manoj Jarange Latest News)

Manoj Jarange
Manoj Jarange Latest News : मनोज जरांगेंचा गर्भित इशारा; म्हणाले, 'सगेसोयऱ्यांच्या मुद्द्यावरून एक इंचही...'

वाळेकरांच्या व्हायरल व्हिडिओवर जरांगे (Manoj Jarange) म्हणाले, त्याला दगडफेकीबाबत आधीच माहिती होती तर त्याने ती पोलिसांना का सांगितली नाही. त्याला कुणी सांगितले दंगल करायला, तपासात तो त्याच्या नेत्याचे नाव घेईल. आता पोलिस आणि तो पाहून घेतील. मात्र मराठ्यानेच मराठ्यांची डोकी फोडली असतील तर राज्यात हे पहिल्यांदाच घडले आहे. मराठ्यांवरील हिसांचाराचे षडयंत्र एका मराठ्याच्या घरातच शिजले रचले असेल तर ते दुर्देवी आहे. यातून त्याच्या नेत्याचे स्वप्न साकार होत असेल तर पाहून घेऊ, असेही त्यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अंतरवालीत (Antarwali Sarati) त्यानेच दंगल करायला लावली असेल, अशी शक्यता आहे. काय कारस्थान रचायचे ते रच, शेवटी ही सूई तुझ्यापर्यंतच येणार आहे. भाजपच्या (BJP) केंद्रीय मंत्र्याने कितीही ट्रॅप रचले तरी मी १० टक्के आरक्षण स्वीकारतच नाही. केंद्रीय मंत्री असला तरी, आणि तू कितीही कार्यकर्ते आंदोलकांत पेरले तरीही मागे हटणार नाही. सग्यासोयऱ्यांसाठी आरक्षण ओबीसीतूनच घेणार, तेही तुझ्या छाताडावर बसून, असा इशाराच जरांगे पाटलांनी दिला आहे.

Manoj Jarange
Manoj Jarange News : मनोज जरांगेंचा 'रास्ता रोको'त बदल; आता 'अशी' ठरली आंदोलनाची रणनीती

तू केंद्रीय मंत्री थोड्या काळासाठी आहेस. त्या पदाचा मराठा जातीसाठी दुरुपयोग करू नकोस. झाले ते पुरे झाले आहे, आता तरी तू मराठे कार्यकर्ते अंगावर घेऊ नकोस. स्वतःला मराठा म्हणवून घेतोस आणि एकएक माणूस मराठ्यांविरोधातच पेरतो! अरे जरा थांब... मराठे घुसले तर बेजारी होईल. केंद्रीय मंत्रिपदाची गर्मी होऊ देऊ नका. हे प्रकार थांबले नाहीतर कुटुंबासह त्या केंद्रीय मंत्र्याचे नाव घेईल. माझा रोख समजत असेल तर त्याने थांबावे आणि आपल्या कार्यकर्त्यांना आवरावे, असा इशाराही जरांगे पाटलांनी दिला आहे. (Maratha Reservation)

मराठ्यांना (Maratha) पुढे करून षडयंत्र रचने बंद करा. समाजाच्या ताटात माती कालवणे बंद करा. त्यांनी कुणाला, कसे पुढे केले, याची सर्व माहिती आहे. नाव न घेता एकदा संधी दिलीय. कारस्थाने थांबवा, नाहीतर त्याचे परिणाम वाईट होतील. तुम्ही केंद्रीय मंत्री व्हा, नाहीतर राष्ट्रपती, माझ्यावर १० टक्के आरक्षण थोपवू शकत नाही. तुमच्या दहा पिढ्या आल्या तरी मी ओबीसीतून आरक्षण घेऊनच दाखवेन, असा सज्जड दमही जरांगेनी भरला आहे. दरम्यान, जरांगे पाटालांनी कुणाचेही नाव घेतले नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात कोण ते भाजपचे केंद्रीय मंत्री, अशी चर्चा सुरू झालेली आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Manoj Jarange
Eknath Khadse News : सूनबाईच्या हाकेला नाथाभाऊ साद घालणार का ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com