Ajit Pawar News : मानलं अजितदादांना ! एका झटक्यात राष्ट्रवादी-शिंदेंच्या आमदारांना २५-२५ कोटी वाटले...

Maharashtra Politics : अजितदादांच्या या भूमिकेमुळे सव्वा वर्ष निधीकडे डोळे लावून बसलेले आमदार खूष झाले आहेत.
Ajit Pawar News:
Ajit Pawar News: Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: ठाकरे सरकारमधील तेव्हाचे उपमुख्यमंत्री,अर्थमंत्री अजित पवारांनी शिंदे-फडणवीसोबत सत्तेत आल्यावरही निधीवाटपाची जुनी चाल खेळली आणि आपल्या बंडाला साथ देणाऱ्या राष्ट्रवादीच्या आमदारांना राष्ट्रवादीच्या आमदारांना २५ कोटी रुपयांचा निधी देऊन टाकला. पण शिंदे गटाचे आमदार निधीवाटपावरुन जुनीच कॅसेट वाजवणार नाहीत,याची काळजी घेऊन त्यांच्या वाट्याचाही निधी दिला आहे. सत्तासंघर्षातून टोकाचा विरोध करणारे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याही मतदारसंघासांठी अजितदादांनी पैसे दिले आहेत.

अजितदादांच्या या भूमिकेमुळे सव्वा वर्ष निधीकडे डोळे लावून बसलेले आमदार खूष झाले आहेत. दुसरीकडे सरकारमधील अजितदादांची ताकद ओळखून असलेल्या शिंदे गटाच्या नेत्यामध्ये आम्हालाही निधी मिळाला, असे सांगून अजितदादांबाबत समाधानी असल्याचे दाखवून दिले आहे.

Ajit Pawar News:
PM Narendra Modi : मोदींच्या परदेश दौऱ्यांच्या खर्चाचा आकडा अडीचशे कोटींच्या पुढे

यातून, राष्ट्रवादीतील फुटीर गटातील आमदारांना मोठी लॉटरी लागली आहे. नवे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या बंडखोरीत साथ दिलेल्या आमदारांच्या मतदारसंघातील विकासकामांसाठी २५ कोटी किंवा त्याहून अधिक निधी मंजूर केला आहे. विधीमंडळात सादर करण्यात आलेल्या पुरवणी मागण्यांमध्ये भाजप-शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या आमदारांच्या मतदारसंघांतील विकास कामांसाठी १५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यातून त्यांनी एकप्रकारे शिंदे गटालाही खूष करण्याचा प्रयत्न केला आहे.

आमदारांच्या मतदार संघातील विकासकामे होण्यासाठी अजित पवार काही समर्थक आमदारांसह भाजपसोबत सत्तेत सामील झाले. अर्थ खाते मिळताच त्यांनी आमदारांकडून मतदारसंघातील विकासकामांची यादीही मागवली होती. त्यानंतर विधीमंडळात सादर केलेल्या पुरवणी मागण्यांमध्ये लोकप्रतिनिधींच्या मतदारसंघांतील विकासकामांसाठी पुरेशी तरतूद केली.

Ajit Pawar News:
Pune News : पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याची तयारी जोरात; महानगरपालिकेने अधिकाऱ्यांना दिले महत्त्वाचे आदेश

महाविकास आघाडीचे सरकार पडल्यानंतर आमदारांना मिळणारा विकासनिधी मिळत नव्हता. पण अजितदादा सत्तेत सामील होताच आमदारांना लॉटरीच लागली आहे. विशेष म्हणजे अजितदादांना आमदारांनी पाठिंबा देण्यामागे निधीवाटप हेदेखील एक कारण असल्याचे सांगितले जाते. अजितदादांना साथ देण्याच्या निर्णयामुळेच नाशिकच्या देवळाली मतदारसंघाच्या विकासकामासाठी ४० कोटींचा निधी मंजूर झाल्याचे आमदार सरोज अहिरे यांनी सांगितले.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com