Ajit Pawar On Ravi Rana : रवी राणांवर अजितदादाही भडकले; म्हणाले, 'महायुती सरकारची...'

Ajit Pawar on Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण कायम राहण्यासाठी महायुतीला मतदान करा. अन्यथा दीड हजार रुपेय काढून घेऊ, असे रवी राणा म्हणाल्याचे राज्यभर वादंग सुरू झाला आहे.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेला राज्यातील महिलांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. मात्र ही योजना पुढे कायम राहण्यासाठी आम्हालाच मतदान करावे, असे आवाहनही महायुतीचे नेते करत आहे.

विधानसभेत महायुतीला मतदान केले नाही तर योजनेतून दिलेले 1500 रुपये परत घेणार असे आमदार रवी राणांनी विधान केले. यावरून विरोधकांसह उपमुख्यमंत्री अजित पवारही Ajit Pawar संतप्त झाले आहेत. त्यांनी रवी राणा यांना आपल्या खास शैलीत सुनावले आहे.

रवी राणांनी Ravi Rana लाडकी बहीण योजनेवर केलेल्या वादग्रस्त विधानावर अजित पवार म्हणाले, कोणीतरी म्हटले की लाडकी बहीण याजनेतून मिळालेले 1500 रुपये परत घेणार. मात्र तसे काही होणार नाही. मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या साक्षीने सांगतो, की हे पैसे परत घेण्यासाठी नाहीत. तुमच्यासाठीच आहेत. कोणी, कधीतरी वेगळी विधाने करतात, त्याच्या बातम्या होतात. त्यातून महायुतीच्या सरकारची नाहक बदनामी होते, याकडेही अजित पवारांनी लक्ष वेधले.

रवी राणा नेमकं काय म्हणाले होते?

अमरावीतीतील एका कार्यक्रमात आमदार रवी राणांनी लाडकी बहीण योजनेबाबत वादग्रस्त विधान केले होते. सरकारने लाडकी बहीण योजनेतून महिलांना 1500 रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. हे सरकार पुन्हा स्थापन झाले तर त्यात वाढ करून तीन हजार रुपये होतील. मात्र त्यासाठी महायुतीला अशीर्वाद द्यावा लागेल. मात्र तुम्ही निवडणुकीत मतरूपी अशीर्वाद दिला नाही, तर तुमचा भाऊ म्हणून तुमच्या खात्यातून योजनेचे 1500 रुपये काढून घेईन.

Ajit Pawar
Uddhav Thackeray : कुंचल्याची मशाल झाली, तिची धग 'त्या' दोघांच्या बुडाला लागणार; उद्धव ठाकरेंचा 'मार्मिक' टोला

रवी राणांच्या या विधानानंतर विरोधकांसह महायुतीतील नेत्यांनीही संताप व्यक्त केला आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी तर थेट सरकारलाच लक्ष्य केले. रवी राणा जे काही बोलले ते सरकारच्या मानतील बोलले असा आरोप त्यांनी केला. खासदार सुप्रिया सुळे यांनी एकेरी भाषा वापरत राणांना दमच भरला आहे. तर महायुतीच्या नेत्या आदिती तटकरे यांनीही आपला संताप व्यक्त केला आहे.

Ajit Pawar
Ravindra Dhangekar : सरकार 'लाडक्या बहि‍णीं'ची फसवणूक करणार; रवींद्र धंगेकर संतप्त

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com