Uddhav Thackeray : कुंचल्याची मशाल झाली, तिची धग 'त्या' दोघांच्या बुडाला लागणार; उद्धव ठाकरेंचा 'मार्मिक' टोला

Marmik Anniversary : मार्मिकच्या वर्धापन सोहळ्यात उद्धव ठाकरेंचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर फटकारे
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : शिवसेना पक्षाची बीजे मार्मिक या साप्ताहिकातून रूजली गेली. बाळासाहेब ठाकरे यांच्या कुंचल्याने मराठी माणसाचा स्वाभिमान जागा करण्याचे काम केले. त्यातून मराठी माणसांच्या हक्कासाठी शिवसेनेची स्थापना करण्यात आली. बाळासाहेबांच्या कुंचल्याने 'मार्मिक'च्या माध्यमातून तर 'धनुष्यबाणा'ने राजकीय स्तरावर मराठी माणसाला न्याय मिळवून देण्याचे काम केले.

आता बदललेल्या राजकीय स्थितीत धनुष्यबाणाची जागा मशालीने घेतली आहे. हा इतिहास एका ओळीत मांडून उद्धव ठाकरेंनी कुंचल्याची मशाल झाली आहे. आता या मशालीची धग दिल्लीतील दोघांच्या बुडाला लावायची आहे. दिल्लीत जाऊन बसलात आणि आम्हाला लाथा मारत असतील तर तंगड्या खेचून खाली आणणार आहे, असे म्हणत नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांना इशारा दिला आहे.

मुंबईत झालेल्या मार्मिक साप्ताहिकाच्या वर्धापन सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही टोले लगावले.

मार्मिकच्या संपादकांनी वर्गणीदार वाढवण्याचे आवाहन केले होते. तो धागा पकडून ठाकरेंनी शिवसेना पक्षावर दावा केलेल्या मुख्यमंत्री शिंदेचा समाचार घेतला. ते म्हणाले, आजचा जमाना असा आहे, की वर्गणीदार आमच्याकडे जास्त आहेत म्हणून मार्मिक आमचा, असे सांगतील. हल्ली डेस्टिनेशन वेडिंग आले आहे. त्यासाठी संपूर्ण हॉटेल बुक केले जाते. म्हणजे हॉटेल आमचेच, असे सांगण्याची पद्धत आहे.

Uddhav Thackeray
Marathwada Vidhan Sabha Election : ''..तर विधानसभा निवडणुकीत मराठवाड्यात महायुतीच्या आमदारांना गुलाल लागणार नाही''

यावेळी ठाकरेंनी शिवसेना स्थापनेच्या काही आठवणींना उजाळाही दिला. मराठी माणसाला करमणूक व्हावी म्हणून मार्मिक सुरू केले. त्यानंतर शिवसेनेची स्थापना झाली तेव्हा नारळ फोडण्यात आला. त्या नारळातील पाण्याचे शिंतोडे माझ्या अंगावर उडाले. त्या शिंतोड्यांनी मला एवढे भिजवले की मी आज शिवसेना पक्षप्रमुख झालो आहे, अशी भावनाही ठाकरेंनी व्यक्त केली.

Uddhav Thackeray
Congress OBC meeting : 'पलटू चाचा' सरकार पाडणार, मोदी मोठा निर्णय घेणार; काँग्रेसच्या कॅप्टन यादव यांचा दावा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com