Ajit Pawar: पुणे जिल्ह्यातील 'हे' आमदार घाबरले...

Lok Sabha Elections 2024 winner: राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवारांची साथ सोडणे या निवडणुकीत फारसे कोणाला परवडले नसल्याचे दिसत आहेत. निकालानंतर आता अजितदादांना मानणाऱ्या आमदारांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
Lok Sabha Elections 2024 winner
Lok Sabha Elections 2024 winnerSarkarnama

Mumbai News: दिल्लीतील 'महाशक्ती' भरवश्यावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडाचा झेंडा फडकाविणारे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादीला लोकसभा निवडणुकीत दणका बसला. भाजप-शिवसेनेच्या साथीने चार मतदारसंघात नशीब अजमावलेल्या अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला एकच जागा आली आहे. त्यातही या पक्षाला बारामती,शिरुरमध्येही पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे.

परिणामी, या दारुण पराभवाने खचलेल्या आणि अजितदादांच्या नेतृत्वावर मोहोर उमटविलेल्या पुणे शहर, जिल्ह्यातील आमदारांना धडकी भरू शकते. म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवारांची साथ सोडणे या निवडणुकीत फारसे कोणाला परवडले नसल्याचे दिसत आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता अजितदादांना मानणाऱ्या आमदारांमध्ये अस्वस्थता असल्याचे बोलले जात आहे.राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर बहुसंख्य आमदार हे अजित पवार यांच्यासोबत गेले.

यात पुणे जिल्ह्यातील चेतन तुपे, अतुल बेनके, सुनील टिंगरे, दिलीप मोहिते पाटील, सुनिल शेळके, दिलीप वळसे पाटील यांचा समावेश आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांनी अजितदादांची पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव केला आहे.

Lok Sabha Elections 2024 winner
Sharad Pawar: ऑल इज वेल...ऑल इज वेल: बारामतीच्या विजयातून शरद पवारांचा थेट संकेत

शिरुरमध्ये महायुतीकडून ही जागा अजित पवार यांच्या गटाला सोडण्यात आली होती. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिंदे गटातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांची लढत ही विद्यमान खासदार डाँ.अमोल कोल्हे याच्यासोबत झाली. यात अमोल कोल्हे यांनी दीड लाखांचा लीड घेत शिवाजीराव आढळरावांना धुळ चारली आहे. पुणे जिल्हातील राष्ट्रवादीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी पक्षाच्या जिल्ह्यातील सहाही आमदारांनी जीवाचे रान केले. पण अजितदादांच्या दोन्ही उमेदवारांना निवडणूक आणण्यात त्यांना यश आले नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com