Mumbai Political News : जागतिक महिला दिनाचे (ता.८) औचित्य साधून महाराष्ट्र सरकारने आपले चौथे महिला धोरण लागू केले. त्यानुसार सरकारी कागदपत्रांमध्ये आईचे नाव लिहिणे बंधनकारक आहे. त्याची पहिली अंमलबजावणी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी स्वत:पासून केली. मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील आपल्या कार्यालयानाबाहेर ‘अजित आशाताई अनंतराव पवार’ अशी पाटी त्यांनी लावली. (Latest Political News)
महिला दिनानंतरच्या तीन सलग सुट्या आल्या. त्यामुळे चौथ्या महिला धोरणाची अंमलबजावणी ते जाहीर झाल्यावर लगेच होऊ शकली नव्हती. मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कार्यालये आहेत. तेथे मोठी गर्दी असते. ही पाटी सोमवारी त्यांच्या आकर्षणाचा, कौतुकाचा विषय ठरली. राज्याच्या महिला धोरणाच्या तात्काळ अंमलबजावणीबद्दल उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यशैलीचे या गर्दीने कौतुक केले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
8 मार्च रोजी जागतिक महिला दिनी राज्याचे चौथे महिला धोरण लागू करण्यात आले. त्यादिवशी महाशिवरात्रीची सुट्टी होती. त्यानंतर शनिवार आणि रविवारची साप्ताहिक सुटी आली. 8 मार्चनंतर सलग तीन दिवसांच्या सुट्टीनंतर मंत्रालयात आलेल्या अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांसाठी, उपमुख्यमंत्री पवार (Ajit Pawar) यांच्या दालनाबाहेरची ही पाटी आश्चर्याची आणि कौतुकाचा विषय ठरली. ती पवारांच्या कृतीशील कार्यशैलीचा पुनर्प्रत्यय देऊन गेली.
एक घाव, दोन तुकडे करण्याची अजितदादांची कामाची शैली आहे. एखादे काम होणार असेल, तर ते मार्गी लावण्याचा प्रयत्न करतात. तसेच होणार नसेल, तर तसे बोलून मोकळे होतात. त्यामुळे कधी-कधी त्यांना नाराजीलाही सामोरे लागते. कामाचा झपाटा नाही, तर उरक सुद्धा असल्याने सकाळी लवकरच त्यांचा दिवस सुरू होतो. सरकारी अधिकाऱ्यांनाही ते कामाला लावतात. कामे चांगली होण्यासाठी ते आग्रही असतात. कामात चूक असेल तर सबंधिताना ते खडसावतात. त्यामुळे त्यांचा प्रशासनावर वचक आहे. ही जरब आणि कार्यशैलीमुळेच चौथ्या महिला धोरणाचा अंमल त्यांनी प्रथम त्यांनी स्वत:पासून केला.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.