Ajit Pawar on Raj Thackeray : 'उद्योग शिल्लक नाहीत, म्हणून..'; अजितदादांनी राज ठाकरेंना फटकारलं

Maharashtra Deputy CM Ajit Pawar MNS chief Raj Thackeray Hindi language political developments : मनसे प्रमुख राज ठाकरेंनी हिंदी भाषा विषय सक्तीच्या विरोध घेतलेल्या भूमिकेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फटकारलं आहे.
Ajit Pawar on Raj Thackeray
Ajit Pawar on Raj ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Maharashtra politics 2025 : त्रिभाषा सूत्रानुसार राज्यात इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा विषय सक्तीचा करण्याचा निर्णय महायुतीनं घेतला आहे. या निर्णयाला मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी तीव्र विरोध केला असून, मराठीचा बळी देऊन हिंदीचं सक्तीकरण खपवून घेणार नाही, असा इशारा दिला आहे.

यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, 'ज्यांना काही उद्योग शिल्लक नाही ते हिंदी भाषेचा विरोध करत आहे', असा टोला लगावला आहे.

अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, "हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे, मराठी आपली ही मातृभाषा आहे. तसेच, इंग्रजी ही जागतिक भाषा आहे. तिन्ही भाषा आपल्यासाठी महत्वाच्या आहे. हिंदीला विरोध करण्याच काही कारण नाही, कारण की मराठी आपली मातृभाषा आहे. काही महिन्यांपूर्वी केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे".

Ajit Pawar on Raj Thackeray
Political Horoscope: महायुती-आघाडीमधील मतभेद उघडकीस येणार; नाशिक, रायगडचा तिढा सुटणार

'त्यामुळे ज्यांच्याकडे काही उद्योग नाही, ते हिंदी भाषेला विरोध करत आहेत', अशी टीका अजित पवार यांनी नाव न घेता राज ठाकरे यांच्यावर केली आहे. अजित पवार यांनी हिंदी भाषेवरून राज ठाकरेंचे नाव न घेता थेट मनसेवर (MNS) निशाणा साधल्याने त्याची रिअ‍ॅक्शन काय येते, याकडे आता लक्ष असणार आहे.

Ajit Pawar on Raj Thackeray
Raj Thackeray: मुख्यमंत्री स्टॅलिननंतर राज ठाकरेंचा त्रिभाषा फॉर्म्युल्याला विरोध; 'शिवतीर्थ'वर आखली जातेय रणनीती

नाशिक दंगली प्रकारावर टार्गेट ठेवून एका पक्षाच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे कटकारस्थान सुरू आहे. यावर अजितदादा यांनी नाशिक दंगल प्रकरणात आम्ही कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून केस दाखल करत नाही, जे दोषी असतील त्यांच्यावर योग्य कारवाई केली जात आहे, असे सांगितले.

बीडचे निलंबित पोलिस उपनिरीक्षक अभिजीत कासले याने केलेल्या आरोपांची सर्व चौकशी केली जाणार आहे. त्यानंतरच योग्य ती पुढची कारवाई होईल, असेही अजित पवार यांनी म्हटले. बीडमध्ये ज्या महिलेला अमानुष मारहाण झाली आहे, त्याची देखील दखल अजित पवार यांनी घेतली आहे. घटनेचे छायाचित्र मला मिळाले आहेत, जे दोषी असतील त्यांच्यावर योग्य कायदेगीर कारवाई केली जाईल, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com